दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अशी ओळख असलेल्या महेश बाबूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबू यांचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश बाबूच्या वडिलांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे.

अनेक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. यानतंर त्यांना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. पण आज पहाटे ४. ०९ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच अनेकांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन

गेल्या वर्षभरात महेश बाबूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यंदा वर्षभरात महेश बाबूच्या कुटुंबियांना मानसिक तणावातून जावे लागले आहे. महेश बाबू यांचा मोठा भाऊ अभिनेता आणि निर्माते रमेश बाबू यांचे ८ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले होते. ते ५६ वर्षांचे होते. रमेश बाबू हे बऱ्याच काळापासून यकृताच्या आजाराशी झुंज देत होते. याच गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाले. यामुळे महेश बाबू यांना धक्का बसला होता.

भावाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर महेश बाबू यांना धक्का बसला होता. त्यावेळी महेश बाबू यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. रमेश बाबू यांच्या निधनाला ९ महिने उलटत नाही तोपर्यंत महेश बाबू यांच्या कुटुंबियांना आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागले.

महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे २८ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण २८ सप्टेंबर रोजी सकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

आणखी वाचा : सुपरस्टार महेश बाबू यांचे मोठे भाऊ चित्रपट निर्माते रमेश बाबू यांचे निधन

महेश बाबू यांची आई वृद्धपकाळामुळे अनेक आजारांशी झुंज देत होती. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारी २८ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली होती. आईच्या निधनाचे दु:ख कमी होत नाही तोपर्यंत त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आज (१५ नोव्हेंबर) महेश बाबू यांचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान महेश बाबू यांच्या कुटुंबियात यंदा वर्षभरात तीन वेळा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आधी भाऊ, त्यानंतर आई आणि आता वडील गेल्यानंतर महेश बाबू पोरका झाला असे ट्वीट अनेक चाहते करत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदनाही व्यक्त करताना दिसत आहेत.