‘झी मराठी’वर लवकरच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रसारित होणार आहे. या एपिसोडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यांनी सुबोध भावेसोबत, राजकारणासह इतर वेगवेगळ्या विषयांवर धम्माल गप्पा मारल्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी विविध गोष्टींवर भाष्य केले आहे.

अभिनेता सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोध भावेने या कार्यक्रमाच्या भागाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनेकजण सुप्रिया सुळेंना विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. निवडून येण्यासाठी उपास वैगरे काही करता का? तुम्हाला शॉपिंग करायला आवडते का? असे अनेक प्रश्न त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार हटके उत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आता घरातही पवार विरुद्ध शिंदे होणार…”

‘महाराष्ट्रात सकाळचा शपथविधी झाला, तेव्हा अजित दादा आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. जेव्हा अजित दादा आणि देवेंद्रजी घराबाहेर पडले, तेव्हा तुमच्या घरात वातावरण कसं होतं?’, असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळेंना विचारण्यात आले. त्यावर ‘तेव्हा मी झोपले होते’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Video: …अन् सुप्रिया सुळेंनी चक्क गुजराती भाषेतून साधला पंतप्रधान मोदींशी संवाद

दरम्यान ‘बस बाई बस’चा सुप्रिया सुळे स्पेशल एपिसोड सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही बोलल्या.