‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये प्रेक्षकांना दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमातील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. म्हणूनच ‘सूर नवा ध्यास नवा’च्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आता कलर्स मराठी घेऊन येत आहे ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर’.

या पर्वातही उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे, परंतु मंचावर असणार आहेत लहान मुले. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमात भाग घेऊ शकतील. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरु झाला आहे. आता १४ आणि १५ जुलै रोजी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये ऑडिशन्स होणार आहेत. या पर्वाचा शुभारंभ ऑगस्टमध्ये होणार असून याचे परीक्षक अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे असणार आहेत. कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदस्त्यात आहे.
सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत मुंबई आणि ठाण्यातील ऑडीशन्स पार पडणार आहेत.

वाचा : ‘धडक’विषयी परश्या म्हणतोय..

१४ जुलै – मुंबई स्थळ – आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (अॅशलेन), डी एस बाब्रेकर मार्ग, साने गुरुजी शाळेमागे, दादर (प), मुंबई – ४०००२८.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ जुलै – ठाणे स्थळ – ब्राम्हण महाविद्यालय, घंटाळी देवी मंदिर रोड, तीन पेट्रोल पंपजवळ, नौपाडा, ठाणे (प) – ४००६०२.