कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सना तसेच प्रेक्षकांना दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. म्हणूनच ‘सूर नवा ध्यास नवा’च्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘सूर नवा ध्यास नवा Little Champs’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वातदेखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे परंतु मंचावर असणार आहेत लहान मुले. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. ६ जुलै पासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरु होणार आहे. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे या पर्वाचे परीक्षक असणार आहेत. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा कोणाच्या हातात असेल हे सध्या गुलदस्त्यातच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमाच्या ऑडिशन्सचे वेळापत्रक-

६ जुलै – रत्नागिरी
पत्ता – गोगटे जोगळेकर कॉलेज, अॅडवोकेट एन. वी. जोशी मार्ग, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोर्टजवळ, रत्नागिरी – ४१५६१२

७ जुलै – कोल्हापूर<br /> पत्ता – देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२

८ जुलै – पुणे
पत्ता – डी. इ. एस. सेकंडरी स्कूल, ४८६ सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस, टिळक रोड, पुणे – ३०

११ जुलै – नागपुर
पत्ता – सुयोग मंगल कार्यालय, ५१, लक्ष्मी नगर, नागपुर – ४४००१०

१४ जुलै – मुंबई
पत्ता – आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (अॅशलेन), डी एस बाब्रेकर मार्ग, साने गुरुजी शाळेमागे, दादर (प), मुंबई – ४०००२८

१५ जुलै – ठाणे<br /> पत्ता – ब्राम्हण महाविद्यालय, घंटाळी देवी मंदिर रोड, तीन पेट्रोल पंपजवळ, नौपाडा, ठाणे (प) – ४००६०२

१७ जुलै – औरंगाबाद<br /> पत्ता – शिवछत्रपती महाविद्यालय , सिडको, एन – ३, औरंगाबाद – ४३१००३

१८ जुलै – नाशिक
पत्ता – रुद्र इंटरनॅशनल स्कूल , अंबड त्रिमूर्ती लिंक रोड, उपेन्द्र नगर, नाशिक – १०

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sur nava dhyas nava little champs coming soon auditions will start from 6th july
First published on: 27-06-2018 at 11:48 IST