बॉलीवूडचा दबंग खान सलमान येत्या २७ डिसेंबरला ५० वर्षांचा होत आहे. यानिमित्ताने सलमानच्या चाहत्यांना सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. पण हे सरप्राइज सलमान नाही तर निर्माता आदित्य चोप्रा देणार आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, सलमानच्या वाढदिवशी ‘सुलतान’ चित्रपटाचा दुसरा टीजर प्रदर्शित करण्यात येणार आहे. अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुलतान’ चित्रपटात अभिनेता सलमान खान हा कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेला पुरेपूर न्याय देता यावा यासाठी सलमानने त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल. ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’नंतर सलमानचा हा पुढचा चित्रपट असेल. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. पण ‘सुलतान’मुळे बॉक्स ऑफीसवर वेगळी समीकरणे पाहावयास मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
‘सुलतान’च्या दुस-या टीजरबाबत अद्याप अधिकृत वृत्त आले नसले तरी त्याचे चाहते नक्कीच टीजरच्या प्रतिक्षेत असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surprise in store for fans on sultan salman khans 50th birthday
First published on: 19-12-2015 at 01:07 IST