गेल्या एक- दोन दिवसांपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटींमध्येही हा उत्साह शिगेला पोहोचला असून दिवाळी पार्ट्यांचंही आयोजन केलं जात आहे. निर्माता रमेश तौरानी यांनी गेल्या आठवड्यात अशीच एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीची चर्चा होण्यामागचं कारण आहे एक फोटो. अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा या पार्टीमधला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हाच फोटो चर्चेचा विषय झाला आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री आलिया भट्टची जिवलग मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर हिच्यासोबत सुशांत पाहायला मिळतोय. आकांक्षाला मिठी मारत तिच्या गालावर किस करतानाचा हा फोटो आहे. आकांक्षाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा फोटो पोस्ट केला आहे. ‘पहिला दिवस..क्रमश:,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. आकांक्षा आणि आलिया एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. आकांक्षाच्या इन्स्टाग्रामवर आलियासोबतचे काही फोटोदेखील पाहायला मिळतात.

वाचा : मादाम तुसाँ संग्रहालयात वरुण धवनचा पुतळा  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकांक्षाची बहिण अनुष्का हिने ‘वेडिंग पुलाव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. आता आकांक्षापण तिच्या बहिणीच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात नशिब आजमावणार असल्याचं म्हटलं जात आहे.