Sushmita Sens Daughters Birthday ex boyfriend rohman shawl | सुश्मिता सेनच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला एक्स बॉयफ्रेंड रोहमनची हजेरी, फोटो झाले व्हायरल | Loksatta

सुश्मिता सेनच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला एक्स बॉयफ्रेंड रोहमनची हजेरी, फोटो झाले व्हायरल

नुकताच सुश्मिताच्या मुलीचा रेनी सेनचा २३ वा वाढदिवस पार पडला.

Sushmita Sen, Sushmita Sen Boyfriends, Sushmita Sen Relationship, Sushmita Sen Controversy, Renne Sen Birthday Party, Ritik Bhasin, Rohman Shaul, सुश्मिता सेन, रेनी सेन, रोहमन शॉल, रेनी सेन बर्थडे
वाढदिवसाच्या पार्टीला सुश्मिताचे एक्स बॉयफ्रेंड्स रितिक आणि रोहमन हजर होते.

अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुश्मिता तिच्या कथित प्रियकर, उद्योगपती ललित मोदींसोबत दिसली होती. या व्हायरल फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यानंतर सुश्मिताच्या घरच्या पार्टीमध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन याने हजेरी लावल्यानंतर तिच्या आणि ललित मोदीमध्ये दुरावा आल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे सुश्मिताच्या खासगी आयुष्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुश्मिता सेनने दोन लहान मुलींना दत्तक घेतले होते. आतापर्यंत सुश्मिताचे नाव अनेक सेलिब्रिटीशी जोडण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी ती उद्योगपती रितिक भसीनला डेट करत होती. पुढे काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर ती रोहमन शॉलला डेट करत होती. पण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचा ब्रेकअप झाला. आता सुश्मिता उद्योगपती ललित मोदी यांना डेट करत आहे असे म्हटले जात आहे. मात्र ब्रेकअपनंतरही तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड्सशी मैत्री जपली आहे.

आणखी वाचा- छेडछाडीचं प्रकरण भोवलं; केआरकेला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अटक

नुकताच सुश्मिताच्या मुलीचा रेनी सेनचा २३ वा वाढदिवस पार पडला. वाढदिवसाच्या पार्टीला सुश्मिताचे एक्स बॉयफ्रेंड्स रितिक आणि रोहमन हजर होते. रितिकने या पार्टीची तयारी करताना मदत देखील केली होती. या पार्टीमधला एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये रेनी केकसमोर उभी राहून त्यावरच्या मेणबत्त्यांना फुंकर मारुन विझवत आहे. रितिकने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ म्हणत रेनीचा व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडीओ री-शेअर करताना तिने ‘माझा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी धन्यवाद’ असे म्हटले. रोहमनने देखील रेनीसह फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. त्याने फोटोवर ‘२३ची झालीस तू. वाढदिवसाच्या शुभेच्छा रेनस्टार’ असे कॅप्शन दिले.

आणखी वाचा- “मी काही तज्ञ नाही पण…” बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर स्पष्टच बोलल्या पल्लवी जोशी

या पार्टीमधला सुश्मिता आणि रेनी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सुश्मिता तिच्या कपाळाचे चुंबन घेत तिला शुभेच्छा देत आहे. रेनीने पार्टीमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सुश्मिताबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने त्या फोटोंना ”माझ्या वाढदिवशी मला भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद.. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. देवाने मला दिलेली सर्वात बहुमूल्य भेट आहेस. आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. धन्यवाद आई.. मी जगात सर्वात जास्त तुझ्यावर प्रेम करते!! खूप प्रेम.” असे कॅप्शन दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2022 at 22:43 IST
Next Story
‘पुष्पा’ फेम अभिनेत्री आता अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार, चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल