scorecardresearch

“काही नाती…”, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हृतिक रोशन आणि सुझान खान यांना वेगळं होऊन जवळपास अनेक वर्षे उलटली आहेत.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये गणली जायची. अनेकांना ‘कपल गोल्स’ देणाऱ्या या जोडप्याने २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हृतिक- सुझान जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानच्या नात्यात फरक पडलेला नाही. नुकतंच सुझानने हृतिकची बहिण सुनैना रोशन हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. त्याचे फोटो शेअर करताना तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे.

नुकतंच हृतिक रोशनची बहिण सुनैना रोशनने ५० व्या वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. या वाढदिवसाच्या पार्टीला सुझानने हजेरी लावली. सुझान खानने याचे अनेक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सुझानने सुनैनाला वाढदिवसाच्या हटके पद्धतीने शुभेच्छाही दिल्या आहेत.

सुझानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटो ती सुनैनासोबत दिसत आहे. यात त्या दोघींनीही ५० अंक लिहिलेला फंक चष्मा परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणाली, सुनैना रोशन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. २०२२ तुझ्यासाठी सुंदर असावे. त्यानंतर तिने सुनैनासोबतचा आणखी एक फोटो शेअर केला. यात त्या दोघींसोबत हृतिक रोशनही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने म्हटले की, “काही नाती कधीही संपणार नाहीत, आनंद, प्रेम आणि नेहमी असंच हसत राहा.” यासोबत तिने काही इमोजीही शेअर केले आहेत.

दरम्यान हृतिक रोशन आणि सुझान खान यांना वेगळं होऊन जवळपास अनेक वर्षे उलटली आहेत. पण आजही ही दोघं अनेक ठिकाणी एकत्र फिरताना, मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात. आजही या दोघांनी त्यांच्यातील मैत्रीच नाते जपले आहे. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघेही मुलांसोबत व्हेकेशन ट्रीपवरही जातात. त्यामुळे या दोघांची नावे कागदावर जरी वेगवेगळी असली तरी ते मनातून अद्याप एकत्र असल्याचे दिसत आहे.

एखाद्या स्त्रीला नेहमी तिच्या स्कर्टची लांबी अन्…, सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायका अरोराने दिले सडेतोड उत्तर

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sussanne khan reunites with ex husband hrithik roshan for his sister birthday some bonds are eternal nrp

ताज्या बातम्या