कोण आहे एलिझाबेथ..? स्वप्नील जोशीच्या ‘बळी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

या थरारक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे.

swapnil joshi, bali movie,
या थरारक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे.

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. स्वप्नीलचे लाखो चाहते आहेत. स्वप्नील यावेळी त्याच्या चाहत्यांना एका वेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्नीलने त्याच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. स्वप्नीलच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘बळी’ आहे. नुकताच ‘बळी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

स्वप्नीलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा थरारक चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. या २ मिनिट १४ सेकंदाचा ट्रेलर पाहताना प्रेक्षक नक्कीच जागेवरून हलणार नाहीत. या चित्रपटामध्ये कोण आहे एलिझाबेथ..? हे गूढ रहस्य उलगडणार आहे.

आणखी वाचा : आपण एवढे श्रीमंत का आहोत? अक्षयच्या मुलाने विचारला होता प्रश्न, ट्विंकल म्हणाली…

या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-२’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. ‘बळी’ची याआधी पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाले होते. त्यांना प्रेक्षकांकडून चांगलात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरियाने केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swapnil joshi bali movie trailer relaed dcp

ताज्या बातम्या