बॉलिवूड अभिनेत्री आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते. त्या दोघांनी त्यांच्या मुलांना लाइमलाइटपासून लांब ठेवले आहे. आज ट्विंकल एक लेखिका म्हणून ओळखली जाते. ट्विंकल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तर एका मुलाखतीत ट्विंकलने असा एक किस्सा शेअर केला होता की ज्यामुळे त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा सुरु झाली.

ट्विंकलने हा किस्सा इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्याची बोलताना सांगितला आहे. ट्विंकल म्हणाली, “कधी-कधी, चांगल्या घरातील मुलांना काही प्रमाणात दोषी असल्याचे वाटते.” पुढे ट्विंकल सुधा यांना विचारते की तुमचा मुलगा हा जमिनीशी जोडून राहण्यासाठी तुम्ही काय केले? यावर सुधा म्हणाल्या की, “त्यांचा मुलगा रोहन हा १३ वर्षांचा असताना त्या आदिवासींना भेटायला घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी त्या त्यांच्या मुलाला म्हणाल्या, त्यांच्यापैकी बरेच जण तुमच्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या गोष्टीत पुढे असतील, तुमचा जन्म एका संपन्न कुटुंबात झाला आहे, त्यामुळे इतरांना तुम्ही कधीही स्वत: हून कमी समजू नका.”

आणखी वाचा : शाल्मलीने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लग्नगाठ!

सुधा यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकल्यानंतर ट्विंकल म्हणाली, “मी सुद्धा माझ्या मुलांसोबत अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. एक दिवस मला माझ्या मुलाने विचारले, माझ्या जवळ या सगळ्या गोष्टी का आहेत, आपण एवढे श्रीमंत का आहोत आणि त्या लोकांकडे का नाही. तेव्हा मी त्याला म्हणाली, जेव्हा तुम्ही अशा कुटुंबात जन्माला येतात तेव्हा तुमची जबाबदारी असते की त्याचा उपयोग केला पाहिजे. तर अशा वेळी ज्यांच्याकडे या गोष्टी नाही त्यांना तुम्ही मदत केली आहे.”

आणखी वाचा : मलायकाच्या ‘या’ सवयीची अरबाजला येत होती चीड

ट्विंकल पुढे म्हणाली, “मला वाटतं त्या दिवसानंतर तो जीवनाकडे वेगळ्यानजरेने पाहतो असे मला जाणवले. एवढंच नाही तर आपल्याला ज्या सुख-सुविधा मिळाल्या आहेत त्याचा वापर हा इतरांना मदत करण्यासाठी केला पाहिजे. “ट्विंकल आणि अक्षयला दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाच नावं आरव आहे तर त्यांना एक लहान मुलगी असून तिचं नाव नितारा आहे.