बॉलिवूड सिनेमांबरोबरच सोशल मीडियावरही कायम सक्रिय आणि चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. बॉलिवूडमधील घराणेशाही असो, राजकिय किंवा सामाजिक तसचं महिलांवरील मुद्दे असो स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मात्र ट्रोलर्सची बोलती बंद करणं स्वराला चांगलच ठाऊक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतच स्वराला तिच्या एका ट्वीटवरून काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. या ट्रोलर्सना स्वराने आता उत्तर दिलं आहे. ‘चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुपरहिट ठरण्याची वाट पाहत आहे’ असं ट्वीट स्वराने केलं होतं. यावर नेटकऱ्यांनी काही कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एक युजर म्हणाला, “तुझं स्वागत आहे. खरचं माझ्या इमारतीत काही दुरुस्तीची काम सुरू आहेत त्यामुळे झोपण्यासाठी शांत जागा मिळत नाहीय. तुझा सिनेमा आहे म्हंटल्यावर थिएटरहून अधिक शांत जागा शोधून साडणार नाही.” असं म्हणत नेटकऱ्याने स्वरावर टीका केली.

हे देखील वाचा: “तीन महिन्यात नवीन चित्रपट…” ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर निलेश साबळेने उडवली अक्षय कुमारची खिल्ली

या टीकाकाराला स्वरानेही उत्तर दिलं आहे. “हा हा! खूप सराव केलेला फालतू विनोद करण्याची तुला संधी मिळाली याचा आनंद आहे. जा आता तुझ्या मित्रांना दाखव की मी तुला रिप्लाय दिलाय.” स्वराच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा या युजरने तिच्यावर निशाणा साधला आहे. “फुशारकी मारण्यासाठी तू कोणी सेलिब्रिटी नाही आणि हो मला इतर लोकांसमोर नाचायला आवडत नाही” असं म्हणत या युजरने पुन्हा स्वराला ट्रोल केलं.

हे देखील वाचा: Koffee With Karan 7: ‘या’ बड्या दिग्दर्शकाच्या सिनेमात आमिरला करायचंय काम

फिल्म ‘जहां चार यार’ हा स्वरा भास्करचा सिनेमा १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात स्वरासह मेहर विज, पूजा चोप्रा, शिखा तलसानिया या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhaskar troll on her tweet for film jahaan charr yaar promotion post kpw
First published on: 06-08-2022 at 15:45 IST