बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज वेगळी माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. तसेच तपासकार्यात सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावर रियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत रियाला पाठिंबा दिला असून मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

रिया चक्रवर्तीविषयी बोलताना स्वराने ट्विटमध्ये म्हटले आहे की,”मला नाही वाटत, ज्या प्रकारे रिया चक्रवर्तीला मीडिया ट्रायलला सामोर जावे लागत आहे, तसे तर कसाबला पण जावे लागले नसेल. देशातील माध्यमांना लाज वाटायला हवी. आपल्या सगळ्यांनाही लाज वाटली पाहिजे की, आपण केवळ हा तमाशा पाहत आहोत,” असा संताप स्वरानं व्यक्त केला आहे.

यापूर्वीही स्वराने सुशांत सिंह आत्महत्ये प्रकरणी सोशल मीडियावर वक्तव्य केले होते. तिने या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करुन मुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्न विचारणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच तिने बॉलिवूडमध्ये पेटून उठलेल्या घराणेशाही या वादावर देखील वक्तव्य केले होते.