महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पिंक’ चित्रपटात लक्षवेधी भुमिकेमुळे तापसी पन्नूला बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चत आली आहे. तापसी ‘पिकं’च्या दमदार भूमिकेनंतर आगामी ‘रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाण्याचे नुकतेच तापसीच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात तापसीने तापसीने तिला आकर्षित करणाऱ्या अभिनेत्यांची यादीत वाचून दाखवली. बॉलिवूडमध्ये एक नाही तर अनेक अभिनेते मला आकर्षित करतात असे ती म्हणाली. बॉलिवूडमधील तिला असणाऱ्या क्रशमध्ये जॉन अब्राहम आणि ‘काबिल’चा अभिनेता ह्रितिक रोशन हे दोन कलाकार अव्वल स्थानी आहेत.

तापसी म्हणाली की, मी जेव्हापासून चित्रपट पाहते तेव्हा पासून जॉन अब्राहम आणि ह्रितिक रोशन या दोन अभिनेते मला आकर्षित करतात. या दोन कलाकारांच्या आकर्षणाचे कारण देखील तापसीने स्पष्ट केले. हे दोन्ही कलाकार नेहमीच सक्रिय दिसतात, असे तापसी म्हणाली. तापसीचा क्रश हा बॉलिवूड अभिनेत्यांभोवतीच थांबत नाही. तर हॉलिवूडमधील सॅम क्लाफिन याची देखील ती मोठी चाहती आहे.  तापसीने नुकतेच तिच्या आगामी’रनिंग शादी डॉट कॉम’ या चित्रपटातील ‘मैनरलेस मंजू…’ गाण्याचे अनावरण केले.

यावेळी तापसीला पुरुषांचा कोणता गुण तुला आकर्षित करतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तापसीने आताच्या घडीला प्रामाणिक पुरुष मिळाला तर पुरेसे आहे असे उत्तर दिले. प्रामाणिक या शब्दाला विस्तारित करुन सांगताना ती म्हणाली की, आपल्या हिंमतीवर आपली ओळख निर्माण करण्यास सक्षम असणारा आणि त्याची वेगळी ओळख असावी, असेही सांगायला ती विसरली नाही. तापसीचा ‘रनिंग शादी.कॉम’ या चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे,  राइजिंग सन फिल्म आणि क्राउचिंग टाइगर मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात घरच्यांचा विरोध असलेल्या जोड्यांचे लग्न लावताना तापसी यात दिसेल. रोमान्स आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात तापसी पन्नू ही निम्मीची तर अभिनेता अमित सध हा टेक्निशियन सरबजीतच्या भूमिकेत दिसेल. बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षी आलेल्या ‘पिंक’ चित्रपटाने अभिनेत्री तापसी पन्नूला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर भलेही तिचा कोणताच नवा चित्रपट आला नसला तरी तापसी ब-यापैकी चर्चेत राहिली आहे. तिच्या अभिनयाची हर पद्धतीने प्रशंसा करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणावर चर्चा करणा-या पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सध्या ती उपस्थिती लावत असल्याचे दिसते.

जयपूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये महिलांशी जोडल्या मुद्दयांवर तापसी  चर्चा करणार होती. पण, जेव्हा तिला कार्यक्रमाच्या आयोजकांची नावावरुन तिने कार्यक्रमात जाण्यास नकार दिला होता. ज्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही  अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करायचे नाही, असे सांगत तापसीने या कार्यक्रमातून माघार घेतली होती.