रॉबर्ट डाउनी ज्युनिअरनं माझ्या मेसेजची दखलही घेतली नाही – तापसी पन्नूची खंत

एका मुलाखतीत तापसीने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

taapsee pannu reveals she once dm robert downey jr
एका मुलाखतीत तापसीने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नू लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापसी तिच्या ‘हसनी दिलरुबा’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा आणखी एक प्रमोशन्ल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तापसी तिचा सहकलाकार विक्रांत मेस्सी यांनी एक लाय डिटेक्टरची चाचणी केली आहे. यावेळी तापसीने एक खंत व्यक्त केली आहे.

हा व्हिडीओ नेटफ्लिक्सने त्यांच्या युट्यूब अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत तापसी आणि विक्रांत यांच्यात सुरु असलेली मज्जा पाहायला मिळतं आहे. ते दोघे ही लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजेच जर कोणी खोटं बोललं तर त्याची माहिती ती मशीन लगेच देते. हे पाहता विक्रांतने तापसीला विचारले की ‘तिला सोशल मीडियावर फॉलो न करणाऱ्या कोणाला तिने मेसेज केला आहे का?’ यावर तापसीने सांगितले की तिने आयर्नमॅनला मेसेज केला होता. “तर, मी रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला मेसेज केला होता आणि त्यावर काहीच रिप्लाय आला नाही. माझं असं झालं की माझे फॉलोअर्स तुझ्याहून जास्त आहेत!”, असे तापसी म्हणाली.

आणखी वाचा : आर्थिक संकट आणि गंभीर आजारांना झुंज देत आहे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

दरम्यान, तापसी लवकरच ‘शाबास मिथू’, ‘लूप लपेटा’, ‘रश्मी रॉकेट’ आणि ‘दोबारा’ या चित्रपटात दिसणार आहेत. तापसीने ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taapsee pannu reveals she once dm robert downey jr but received no response dcp

ताज्या बातम्या