कॉमेडी शोबद्दल म्हणायचं झालं तर गेली अनेक वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. या शोमधील प्रत्येक पात्राने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. या शोमधील प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यातीलच एक महत्वाचं पात्र म्हणजे ‘पत्रकार पोपटलाल’. पोपटलाल आणि त्याच्या लग्नाचं टेंशन यामुळे या शोला एक वेगळीच मजा आलीय. अभिनेता श्याम पाठक पोपटलाल ही महत्वाची भूमिका साकारत असून ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

पण ‘तारक मेहता… ‘या शोमध्ये पोपटलालची भूमिका साकारणाऱ्या श्याम पाठकने हॉलिवूड सिनेमातही काम केल्याचं अनेकांना ठाऊक नसेल. खरं तर श्याम पाठक यांनी ‘लस्ट कॉशन’ या एका चायनीज सिनेमात काम केलं असून हा एक रोमॅण्टिक सिनेमा होता. २००७ सालात हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात पोपटलालने म्हणजेच श्याम पाठकने एका दागिन्यांच्या दुकानातील विक्रेत्याची भूमिका साकारली होती. या सिनेमात श्याम पाठकसोबत अभिनेता अनुपम खेर देखील झळकले होते. या सिनेमातील पोपटलालचा सुटा-बुटातील लूक पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shyam Pathak (@shyampathak01)

हे देखील वाचा: “गोपी बहू संस्कार विसरलीस का?”, बेली डान्सच्या व्हिडीओमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ट्रोल

तर या व्हिडोतील पोपटलाच इंग्रजी एकूनही तुम्हा अवाक व्हाल. पोपटलालनेच म्हणजेच अभिनेता श्याम पाठकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. “माझ्या जुन्या कामापैकी एक..जुने दिवस..हॉलिवूड” असं तो कॅप्शनमध्ये म्हणालाय.

‘लस्ट कॉशन’ या सिनेमात श्याम पाठत अनेक सीनमध्ये आहेत. पोपटलाल ही त्याची भूमिका गाजली असली तरी श्यामने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलंय.