छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत गेली १२ वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. पण तिने ही मालिका का सोडली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, नेहाने लॉकडाउननंतर पुन्हा तारक मेहता मालिकेचे चित्रीकरण सुरु झाल्यानंतर सेटवर येणास नकार दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेहाने मालिका सोडण्याचा निर्णय खूप आधीपासून घेतला होता. तिने निर्मात्यांना याबाबत माहिती देताच त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिचे करिअरशी संबंधीत काही वेगळे प्लॅन असल्यामुळे तिने ही मालिका सोडली असे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तारक मेहता मधील अंजली मेहता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी सुनैना फौजदार हिची निवड केली आहे. सुनैना येत्या काही काळात मालिकेत अभिनय करताना दिसेल. मात्र तिची या मालिकेत एण्ट्री कशी होणार? याबाबत निर्मात्यांनी अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.