मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

राजची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

raj anadkat, raj anadkat instagram,
राजची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत बबीताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चा पाहता मुनमुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता राजने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राजने ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. ‘माझ्याबद्दल माझ्या संमतीशिवाय सातत्याने लिहित असलेल्या प्रत्येकाला, तुमच्या या सगळ्या कथांमुळे माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. अशा सगळ्या बातम्या लिहिणाऱ्या सगळ्यांनी तुमच्यात असलेली ही सर्जनशीलता इतर गोष्टींमध्ये वापरा, त्याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. देवा त्यांना सद्बुद्धी दे,’ अशा आशयाची पोस्ट राजने शेअर केली आहे.

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

आणखी वाचा : ‘हे टी-शर्ट २०० रुपयांना लिंकिंग रोडला मिळेल’, कपड्यांमुळे करीना कपूर झाली ट्रोल

दरम्यान, राज आणि मुनमुन हे गेल्या बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यामुळे त्या दोघांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मुनमुन गेल्या १३ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. तर राज आधी भव्य गांधी टप्पूची भूमिका साकारत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah after munmun dutta raj anadkat slams netizens for cooking up false stories about him dcp

ताज्या बातम्या