गेल्या १२ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेतील कलाकरांनी त्यांच्या सहज अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं आहे. अलिकडेच या मालिकेने ३ हजार भागांचा टप्पा गाठला. या १२ वर्षामध्ये मालिकेमध्ये अनेक बदल झाले . काही कलाकार ही मालिका सोडून गेले. तर, काही नव्या कलाकारांची एण्ट्री झाली. यामध्ये टप्पू ही भूमिकादेखील भव्य गांधी आणि राज अनादकट या दोन कलाकारांनी साकारली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला. मात्र, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचा लाडका अभिनेता कोणता हे त्यांनी अलिकडेच सांगितलं आहे.

‘तारका मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरु झाल्यापासून बालकलाकार भव्य गांधीने टप्पू ही भूमिका साकारली. जवळपास २००८ ते २०१७ पर्यंत भव्य ही भूमिका करत होता. त्यानंतर भव्यने ही मालिका सोडली. त्याच्या जागी अभिनेता राज अनादकट याला रिप्लेस करण्यात आलं. सध्या राज, टप्पूची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या. त्यातच आता दिलीप जोशी यांनी दोन्ही कलाकारांपैकी त्यांचा आवडता कोणता हे सांगितलं आहे.

आणखी वाचा- बबिताचा फोटो पाहून टप्पू झाला अवाक्; केली ‘ही’ कमेंट

“भव्य आणि मी जवळपास ९ वर्ष पडद्यावर वडील-मुलाची भूमिका केली आहे. त्यामुळे आता तो नसल्यामुळे मी निश्चितच त्याला मिस करतो. त्याच्यासोबत एक खास नातं तयार झालं होतं. तारक मेहता का उल्टा चष्मामधील प्रत्येक कलाकार खास आहे. त्यामुळे भव्य आणि राजमध्ये तुलना करणं योग्य नाही. त्यांच्यापैकी एकाला निवडणं अवघड आहे”, असं दिलीप जोशी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणतात, “राज खरंच एक मेहनती आणि चांगला अभिनेता आहे. कमी काळात राजने प्रत्येक कलाकाराशी मैत्रीचं नातं निर्माण केलं आहे.”
दरम्यान, सध्या राज अनादकट हा टप्पूची भूमिका साकारत आहे. भव्य गांधीप्रमाणेच राजदेखील कमी कालावधीत लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेकदा राज आणि मुनमुन दत्ताच्या मैत्रीची चर्चा होत असते. त्यामुळे राज अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो.