छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. मात्र तारक मेहता हे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मालिकेला रामराम केला. त्यानंतर ते सातत्याने चर्चेत आले आहेत. शैलेश लोढा याने ही मालिका सोडल्यानंतर तो लवकरच एक कविता शो होस्ट करताना दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता शैलेश लोढा हे कविता शो होस्ट करताना दिसणार आहेत. तो वाह भाई वाह हा कविता शो होस्ट करत आहे. यात प्रेक्षकांना कविता ऐकायला मिळणार आहेत. त्यासोबतच यात व्यंगचित्रही पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे यात कॉमेडीचा तडकाही पाहायला मिळणार आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप का ठरला? दिग्दर्शक म्हणाला “या चित्रपटाला राजकीय…”

शैलेश लोढा हे स्वतः एक उत्तम कवी आहेत. नुकतंच ‘वाह भाई वाह’ या शोबद्दल बोलताना तो म्हणाला, “या नवीन शोचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. स्वत: कवी असल्याने या कार्यक्रमाचे स्वरुप माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आपल्या देशातील कवींना आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वाहिनीने असा शो करण्याचा निर्णय घेतला याबद्दल मी फार कृतज्ञ आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा शो नक्कीच आवडेल.”

“या प्रवासात काही अतिशय खडतर क्षण आले पण…”, ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून शैलेश लोढा यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. शैलेश एक अभिनेता असून कवी आणि लेखक देखील आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत.