राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारी भजनं, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असं चित्र अयोध्येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. या पार्श्वभूमीवर तारक मेहता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने आनंद व्यक्त केला आहे. हा आपल्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचं तिनं म्हटलं आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार; केंद्रानं शिफारस स्वीकारली

“भारतासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा क्षण पाहण्याची संधी मिळतेय ही आपल्या पिढीसाठी एक अभिमानास्पद बाब आहे. परमेश्वरा अशीच आमच्यावर कृपा ठेव. बोला जय श्री राम…” अशा आशयाचं ट्विट करुन मुनमुन दत्ताने आनंद व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

अवश्य पाहा – राम मंदिर आणि भाजपाचा अजब योगायोग; शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखवलं ते दुर्मिळ नाणं

मंदिराचे प्रारूप कसं असेल?

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.