पुणेकरांनी तब्बूच्या चित्रपटाचे शूटिंग पाडले बंद

नागरिकांनी ही शूटिंग बंद पाडल्याची माहिती आहे.

tabu
तब्बू

‘शूट द पियानो प्लेअर’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री तब्बू पुण्यातील खडकी रेंज हिल भागात आली होती. मात्र नागरिकांनी हे शूटिंग बंद पाडल्याची माहिती आहे. तेथील रस्ता लहान असल्याने आणि कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शूटिंग सुरु करण्यात आल्याने चित्रीकरण बंद पाडण्यात आले. रस्ता अरूंद असल्याने शूटिंगमुळे तेथे वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे या भागातील स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने शूटिंग थांबवून तब्बूला परत जावे लागले.

दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या आगामी ‘शूट द पियानो प्लेअर’ या चित्रपटात तब्बू आणि आयुषमान खुराना भूमिका साकारणार आहेत. चित्रपटातील काही भागाचे शूटिंग पुण्यातील खडकी रेंज हिल भागात होणार होते. त्यासाठी सकाळपासून तयारीदेखील करण्यात आली होती. शूटिंगसाठी तेथील भुयारी मार्ग बंद करण्यात आला होता. ऐन गर्दीची वेळ असल्याने नागरिकांना कामाला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. वाहतूक कोंडी झाल्याने त्या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन कोणाच्या परवानगीने शूटिंग सुरू केले, परवानगीचे पत्र आहे का?, असा प्रश्न विचारला. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन शूटिंग रद्द करून तब्बूने तेथून जाणे पसंत केले.

VIDEO : चंदन कपिलसमोर विमानातील ‘त्या’ वादाची आठवण काढतो तेव्हा…

तब्बूने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या अविवाहीत असण्यामागचा खुलासा केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ४५ वर्षीय तब्बूने एका मुलाखतीत खुलासा केला की, ‘अजय देवगणमुळे मी आजपर्यंत अविवाहित आहे.’ इतकंच नाही तर दर दोन दिवसांनी माझ्यासाठी मुलगा शोधण्यासाठी अजयला फोन करत असल्याचंही तब्बूने या मुलाखतीत सांगितलं होतं. तब्बू आणि अजय २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांनी ‘विजयपथ’, ‘हकिकत’, ‘तक्षक’ आणि ‘दृश्यम’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्याचबरोबर आता ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटातही दोघे एकत्र काम करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tabu shoot the piano player movie shooting closed down by citizens in pune

ताज्या बातम्या