रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री

चित्रीकरणासाठी मोठे सेट उभारण्यात आले आहेत.

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री
tollywood star rajnikanth

रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या आगामी काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. याआधी रजनीकांत अन्नत्थेमध्ये या चित्रपटात दिसले होते, ज्याचे दिग्दर्शन सिरूथाई फेम दिग्दर्शक शिवा यांनी केले होते. या चित्रपटात अभिनेता कीर्ती सुरेश आणि नयनतारा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. कीर्ती सुरेशने रजनीकांतच्या बहिणीची भूमिका केली होती, तर नयनताराने रजनीकांतच्या विरुद्ध जोडी साकारली होती.अलिकडेच, रजनीकांत यांनी स्पष्ट केले की १५ किंवा २२ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच पोस्टरसह चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले होते. चित्रपटातील आणखीन एक नाव समोर आले आहे. ते नाव म्हणजे तमन्ना भाटिया. दक्षिणेतील अनेक सुपरहिट चित्रपटात तिने काम केले आहे. बॉलिवूडमध्ये ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले आहे. तमन्ना भाटिया ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सुपरस्टार रजनीकांत राजकारणात पुन्हा सक्रीय होणार? राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

नुकतेच रम्या कृष्णनने जाहिर केले की तम्मना ‘जेलर’चा एक भाग आहे. ती पुढे म्हणाली की तम्मना १० ऑगस्टपासून शूटिंगमध्ये सहभागी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तमन्नाला ‘जेलर’च्या चित्रीकरणासाठी तयार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या हैदराबाद येथे सुरु आहे. या चित्रीकरणासाठी मोठे सेट उभारण्यात आले आहेत. तमन्ना आगामी शेड्युलमध्येही सहभागी होणार आहे. या चित्रपटात तमन्ना रजनीकांत यांच्यासोबत रोमान्स करणार आहे की नाही हे स्पष्ट नाही. लवकरच, कलाकार आणि क्रू संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल.

सुपरस्टार रजनीकांत यांचा मनोरंजनसृष्टीत जितका दबदबा आहे तितकेच ते राजकारणातही काही महिन्यांपर्यंत सक्रिय होते. २०१७ मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल टाकत असल्याची घोषणा केली होती. साडेतीन वर्ष राजकारणात सक्रिय राहिल्यावर जुलै २०२१ मध्ये त्यांनी राजकारणाला रामराम केला. त्यानंतर ते पूर्णपणे चित्रपटसृष्टीत कार्यरत झाले आहेत.

जेलर चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले की हा चित्रपट व्यवसायिक आणि मनोरंजन करणारा आहे. कन्नड अभिनेता शिवराजकुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सन पिक्चर्सने मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली असून या संपूर्ण चित्रपटासाठी अनिरुद्ध रविचंदर संगीत देणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘आमिर खानचं करिअर संपलं’ म्हणत केआरकेने शाहरुख-सलमानलाही दिला ‘हा’ इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी