तमिळ संगीतकार व अभिनेता विजय अँटनीच्या मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. ती अवघ्या १६ वर्षांची होती. मीरा अँटनीने १९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात पहाटे गळफास घेऊन जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येचा कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आता तिच्या आईने तिचा एक फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

विजय अँटनीच्या पत्नीचे नाव फातिमा आहे. ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा नावाच्या दोन आहेत, त्यातील मीराने आत्महत्या केली आहे. “जर मला माहीत असतं की तू फक्त १६ वर्षे जगशील, तर मी तुला माझ्या खूप जवळ ठेवले असते, तुला सूर्य चंद्रालाही दाखवले नसते, तुझ्या विचारात, आठवणीत मी मरत आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, बाबा आणि आईकडे परत ये. लारा तुझी वाट पाहत आहे,” असं फातिमाने मीराचा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे.

विजयने देखील लेकीच्या निधनानंतर पोस्ट शेअर केली होती. “माझी मुलगी मीरा खूप प्रेमळ आणि धाडसी होती. जिथे जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, गरिबी आणि द्वेष या गोष्टी नाहीत, अशा शांत आणि चांगल्या ठिकाणी ती आता गेली आहे. ती माझ्याशी बोलत आहे. मीही तिच्याबरोबर मेलो आहे आणि आता मी तिच्यासाठी वेळ घालवत आहे. आता मी तिच्या नावाने सर्व चांगल्या गोष्टी करेन आणि त्याची सुरुवात ती करेल,” असं विजयने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीरा १९ सप्टेंबरला तिच्या चेन्नईमधील अलवरपेट येथील राहत्या घरी पहाटे ३ वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. ती चेन्नईतील एका लोकप्रिय शाळेत शिकत होती.