दाक्षिणात्य सुपरस्टार थलपति विजयने गेल्या वर्षी अभिनय क्षेत्राला रामराम करत राजकारणात पाऊल ठेवलं. तमिळ सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या विजयने २ फेब्रुवारी २०२४ला तळिलगा वेत्री कजगम ( तामिळनाडू विजय संघ ) द्वारे राजकारणात एन्ट्री केली. मोठ्या दिमाखात विजयची राजकारणात एन्ट्री झाली होती. नुकताच अभिनेता इफ्तार पार्टीमध्ये पाहायला मिळाला. त्याने एक दिवसाचा रोजा ठेवला होता. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. रमजान सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे. यानिमित्ताने विजयने काल, ७ मार्चला चेन्नईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीमध्ये विजय नमाज पठण करताना दिसला. पांढरे कपडे, डोक्यावर टोपी या पेहरावातील विजयचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

थलपति विजयने चेन्नईतील रोयापेट्टाच्या YMCA मैदानावर इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या राजकीय पक्षाकडून इथे सगळी व्यवस्था करण्यात आली होती. माहितीनुसार, या पार्टीमध्ये चेन्नईच्या १५ मशिदींच्या इमामांना निमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच ३००० लोकांना थांबण्याची व्यवस्था केली होती. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या माहितीनुसार, विजयने या एका दिवसाचा रोजा केला होता आणि नमाज पठण केल्यानंतर तो सोडला होता.

विजयच्या इफ्तार पार्टीमधील फोटो, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “थलपति प्रती अजून आदर वाढला.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मी याला राम समजतं होतो. पण हा अब्दुल निघाला.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आजपासून याचे चित्रपट पाहणं बंद करणार.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, थलपति विजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा अ‍ॅक्शन, थ्रिलर चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात प्रशांत, प्रभु देवा, मोहन, जयराम, अजमल अमीर, वैभव, योगी बाबू, प्रेमगी अमरेन, स्नेहा, लैला आणि मीनाक्षी चौधरीबरोबर पाहायला मिळला होता. आता त्याचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याचं दिग्दर्शन एच. विनोथने केलं आहे. या चित्रपटात विजयसह पूजा हेगडे, बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज यांनी काम केलं आहे. तसंच अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.