दक्षिणात्य मॉडेल आणि अभिनेत्री तनिषा सिंहने यावर्षी अंधेरी येथील नृत्यवाटिका स्टुडिओमध्ये प्रसिध्द बॉडी पेंटर पूनम सलेजा हिच्याकडून नवरात्रीसाठी खास बॉडी पेंटिंग करून घेतले आहे. तनिषाने आपल्या पाठीवर जय माँ दुर्गा आणि गरब्याचे पेंटिंग काढून घेतले आहे.
फोटो गॅलरी : तनिषाचे नवरात्री स्पेशल बॉडी पेंटिंग
त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांसोबत गरबा आणि दांडिया नृत्यसुध्दा केले. एवढंच नव्हे तर गुजराती अभिनेत्री एकता जैन हिच्यासोबतही नृत्य केले. तनिषा ही एक खूप चांगली नृत्यांगणा देखिल आहे. त्यामुळेच नवरात्रीच्या निमित्ताने तिने ही संधी सोडली नाही. नवरात्रीनिमित्त तनिषा रोज नवीन पेहराव करून दांडिया खेळण्यास जाणार आहे आणि तिचे हे सर्व पेहराव डिझायनर रोहितने तयार केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2013 रोजी प्रकाशित
फोटो गॅलरी : दक्षिणात्य अभिनेत्री तनिषाचे नवरात्री स्पेशल बॉडी पेंटिंग
तनिषाने आपल्या पाठीवर जय माँ दुर्गा आणि गरब्याचे पेंटिंग काढून घेतले आहे.

First published on: 10-10-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanishas navratri special body penting