करोना व्हायरसमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये अनेक कलाकारांचे घरात काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजीची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचा पत्नी क्रुति भट्टसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांची भांडी घासण्यावरुन भाडंणे होतात तसेच ते पत्नीला मजेशीर अंदाजात घरात झाडूने मारताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बापूजीने हा व्हिडीओ मजेशीर अंदाजात बनवला आहे. त्या दोघांमध्ये कोणतेही वाद किंवा भांडणे नाहीत. उलट अमित आणि त्यांची पत्नी लॉकडाउनचा संपूर्ण वेळ एकमेकांसोबत आनंदात घालवताना दिसत आहेत. त्यांनी दरम्यान अनेक टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी तारक मेहताका उल्टा चश्मामधील अभिनेता तन्मय वेकारियाच्या इमारतील करोनाग्रस्त सापडला होता. त्यामुळे त्याची इमारत सील करण्यात आली होती. याची माहिती त्यांनी स्वत: दिली होती. ‘होय, बातमी खरी आहे. इमारतीतील तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने सील करण्यात आली आहे. मी सुद्धा १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहत आहे’, असे तन्मयने सांगितले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarak mehta ka ooltah chashmah bapuji beats his wife by broom in a viral video avb
First published on: 03-05-2020 at 15:21 IST