अभिनेत्री राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला असून तिने याचे काही फोटोही शेअर केले आहेत. राखी आणि आदिलच्या लग्नाबद्दल विविध खुलासे समोर येत असताना प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी याबद्दल एक ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी राखी सावंतच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. त्या दोघांचा निकाह २९ मे २०२२ ला झाला असून त्यांनी २ जुलै २०२२ ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केले होते. राखी सावंतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोत आदिल आणि राखी यांच्या गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. राखी सावंतचे हे दुसरं लग्न आहे. यावर आता आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी कमेंट केली आहे.
आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? 

तस्लिमा नसरीन यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी राखी सावंतच्या लग्नाबद्दल कमेंट केली आहे. “राखी सावंतलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला, कारण तिने एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुस्लिम आणि बिगर-मुस्लिम यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे”, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : सरोगसीबद्दलच्या ‘त्या’ ट्वीटवर तस्लिमा नसरीन यांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या “प्रियांका आणि निकचा काहीही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राखी सावंतच्या लव्ह लाइफची नेहमीच चर्चा होताना दिसते. राखीनं २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशबरोबर लग्न केलं होतं. ते दोघे बिग बॉसच्या रिअ‍ॅलिटी शो मध्येही दिसले होते. पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली. “मी आणि आदिलने लग्न केलं आहे. आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलंय आणि त्यानंतर निकाह केला. आदिलनं मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे मी या लग्नाबद्दल ७ महिने लपवून ठेवलं.” अशी प्रतिक्रिया राखीने दिली होती.