‘बिग बॉस’ हा शो सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक मानला जातो. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही बिग बॉसच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. तर प्रतीक सहजपाल फर्स्ट रनरअप ठरला. करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र या सर्वांना मागे टाकत तेजस्वीनं मात्र विजेतेपदाच्या शर्यतीत बाजी मारली. पण तेजस्वीला बिग बॉसचं विजेतेपद देण्यावरुन अनेक टीव्ही कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली तर काहींनी तिला पाठिंबा दिला. मात्र नुकतंच तेजस्वीने एका मुलाखतीत या टीकांवर सडेतोड उत्तर दिले आहे.

बिग बॉसचे विजतेपद पटकावल्यानंतर तेजस्वीने ‘ई टाईम्सला’ मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने टीव्ही कलाकारांनी आक्षेप घेतल्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावर तेजस्वी म्हणाली, “माझे असे मत आहे की या शोच्या स्वरूपावर आणि लोकांकडून मला मिळणाऱ्या प्रेमावर मी विश्वास ठेवला पाहिजे. मला जास्त मतं मिळाली आहे, हे अगदी स्पष्ट आहे. पण ज्यांना या निकालाबाबत शंका त्यांनी या आधी झालेल्या पर्वातील निकालांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे.”

“विशेष म्हणजे लोकांनी माझा विजय साजरा करावा अशी अपेक्षा मी का करावी? मी आणि माझे कुटुंब आनंदी असले पाहिजे. तसेच माझ्या चाहत्यांनीही आनंद साजरा करावा, कारण हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पण जे माझा द्वेष करतात ते याबाबत आनंदी का होतील? माझ्या विजयामुळे माझे द्वेष करणारे नेहमीच दु:खी राहतील. त्यांना दु:खी होण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करेल असे नाही. मी आईस्क्रीम नाही. मी माणूस आहे,” असे तेजस्वी म्हणाली.

Bigg Boss 15 Winner : बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, तेजस्वी प्रकाश ठरली विजेती

‘बिग बॉस १५’ मध्येच तेजस्वी प्रकाशला एकता कपूरच्या ‘नागिन ६’ या शोची ऑफर करण्यात आली होती. या शोमध्ये तेजस्वी सर्वोत्कृष्ट शेष नागिनच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ‘नागिन ६’मुळे तेजस्वी जिंकली आहे, अशा कमेंट काहींनी केल्या होत्या. याबाबत तेजस्वीला विचारले असता ती म्हणाली, “मला वाटते की ‘नागिन ६’ ऑफर करण्यात आला, कारण मी बिग बॉसमध्ये चांगले काम करत होते. जर मी बिग बॉस जिंकला नसता तरी मला नागिनची ऑफर मिळालीच असती. माझा विजय हा माझा विजय आहे. मला ‘नागिन’ शो मिळाला, म्हणून मला जिंकवण्यात आलेले नाही, हे असे चालत नाही.”

“बिग बॉस’मधील माझा विजय माझ्यापासून काहीही हिरावून घेऊ शकत नाही. मला एक गोष्ट समजत नाही की माझ्या बाबतीत जे घडले ते मागील पर्वात घडले नाही? एखादा अपवाद असावा आणि मी त्याला अपवाद आहे. ‘नागिन’ शो मिळवणारी आणि हुशार खेळाडू देखील असू शकते यावर विश्वास ठेवणे लोकांना इतके अवघड का जात आहे? लोक मला नेहमी घरातील एक प्रबळ दावेदार म्हणून पाहत होते,” असेही तेजस्वीने सांगितले.

तेजस्वी प्रकाशच्या विजेतेपदावर टीव्ही कलाकारांनीच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गौहर खान, काम्या पंजाबी आणि अनिता हसनंदानीसह इतर काही स्टार्सनी सोशल मीडियावर तेजस्वीच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले. या सर्व कलाकारांनी प्रतिक हा बिग बॉसचा योग्य विजेता असल्याचे म्हटले होते. बिग बॉस 15′ च्या अंतिम सोहळ्यात तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित करण्यात आले. तेजस्वी व्यतिरिक्त प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा टॉप-3 मध्ये होते. यात प्रतीक हा फर्स्ट रनरअप तर करण कुंद्रा सेकंड रनरअप ठरला.