टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. तेजस्वीनं अलिकडेच बिग बॉस १५चं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर आता ती लवकरच एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘नागिन’च्या ६ व्या पर्वात दिसणार आहे. पण यासोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात असतानाच करण कुंद्रा आणि तेजस्वी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुलीही दिली. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्वीनं तिच्या रिलेशनशिपबाबत काही खुलासे केले आहेत.

‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वीनं बॉयफ्रेंड करण कुंद्रा आणि तिच्या नात्यावर भाष्य केलं. या मुलाखतीत, ‘करण कुंद्राला एखाद्या वेब सीरिजमध्ये किंवा शोमध्ये इंटिमेट सीन करावा लागला तर यामुळे तेजस्वीला असुरक्षित वाटेल का?’असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना तेजस्वी म्हणाली, ‘मी पॉजेसिव्ह नाहीये. या उलट करण माझ्याबाबत पॉजेसिव्ह आहे. त्याला असुरक्षित वाटतं. मी नेहमीच त्याला सांगते की, ‘तू खूप स्मार्ट आहेस, कारण कोणतीही गोष्ट तू जाहीरपणे सांगत नाहीस त्यामुळे मला सर्वजण असुरक्षित असल्याचा टॅग देतात.’

तेजस्वी पुढे म्हणाली, ‘अशा वेळी ती त्या भूमिकेची गरज आहे हे समजून घेईन आणि त्याला नक्कीच पाठिंबा देईन. पण करणच्या बाबतीत आपण असं म्हणू शकत नाही. करणनं या आधीही किसिंग सीन दिले आहेत. पण त्यानं मला स्पष्ट शब्दात कोणत्याही प्रकारचा किसिंग सीन देण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे त्याला या नात्यात माझ्यापेक्षा जास्त असुरक्षित वाटतं. पण मला अजिबात असुरक्षित वाटत नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस्वीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच एकता कपूरच्या ‘नागिन ६’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात ती एक घातक रोगापासून संपूर्ण जगाला वाचवणाऱ्या नागिनच्या भूमिकेत दिसणार आहे. हा शो येत्या १२ फेब्रुवारीपासून कलर्स टीव्हीवर सुरू होत आहे.