बिग बॉस १५ फेम अभिनेत्री मराठी चित्रपटात, लक्ष्याच्या मुलासोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स | tejaswi prakash and abhinay berde upcoming film man kasturi re poster release | Loksatta

बिग बॉस १५ फेम अभिनेत्री मराठी चित्रपटात, लक्ष्याच्या मुलासोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स

हिंदी टीव्ही सृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे.

बिग बॉस १५ फेम अभिनेत्री मराठी चित्रपटात, लक्ष्याच्या मुलासोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स
‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे पोस्टर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस १५ फेम तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटातून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्या सोबत मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे झळकणार आहे. अभिनय आणि तेजस्वी ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचे पोस्टर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कुटवरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे आणि त्यांचा हा लूक सोशल मिडीयावर लक्ष वेधून घेत आहे. जसा पोस्टरचा लूक फ्रेश आहे, तसाच फ्रेश लूक संपूर्ण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक युथफुल चित्रपट आहे, असं दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले आहे. संकेत माने याचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे.

चित्रपटाचं पोस्टर अभिनयनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, ‘लॉकडाऊननंतर शूट केलेला आणि तुमच्या भेटीला येणारा माझा पहिला चित्रपट, खूप अतूर्तेने ह्या चित्रपटाची वाट बघत होतो, आज गुडी पाडव्याच्या निमित्ताने आमचं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झालाय चित्रपटही लवकरच तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये पाहता येईल.’

‘ती सध्या काय करते’, ‘अशी ही आशिकी’ आणि ‘रम्पाट’नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. तर, मुळची मराठी असलेल्या तेजस्वीनीने गेली काही वर्षे ‘संस्कार -धरोहर अपनों की’, ‘स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ आणि त्यानंतर ‘बिग बॉस १५’ मधून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता तेजस्वी मराठी चित्रपटात दिसून येणार आहे.

लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येईल. या चित्रपटाचे संगीतही खास असेल, टाईम्स म्युझिक या चित्रपटाशी जोडले गेले आहेत. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अँड आर्टस, वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणा-या या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईत झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘ढोलिडा’ गाण्यावर मायराचा धम्माल डान्स, Video एकदा पाहाच

संबंधित बातम्या

‘अवतार २’ बघताना प्रेक्षकांनी टॉयलेटला कधी जावं? दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचं भन्नाट उत्तर
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
राणा दग्गुबाती भारतातील प्रसिद्ध विमान कंपनीवर संतापला; ट्वीट करत म्हणाला…
“बाळासाहेब ठाकरेंमुळेच आज मी…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा मोठा खुलासा
अभिनेते अरविंद धनू यांचे निधन, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील भूमिका ठरली होती लोकप्रिय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
जपानविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाचे पारडे जड
विश्लेषण: नीति आयोग: त्यांचा आणि आपला..
ऑस्ट्रेलियाला नमवत अर्जेटिना उपांत्यपूर्व फेरीत
ब्राझीलसमोर दक्षिण कोरियाचे आव्हान
भारत-बांगलादेश एकदिवसीय मालिका: बांगलादेशचा भारतावर रोमहर्षक विजय