7 year leap in Muramba Serial: ‘मुरांबा’ या मालिकेत नवीन वळण येत आहे. इरावतीच्या कटकारस्थानांमुळे अक्षय व रमा यांच्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. इरावतीने अक्षय आणि मुकादम कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याची धमकी देत रमाला त्यांच्यापासून दूर केल्याचे पाहायला मिळत आहे.
या सगळ्यात बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच रमाला तिच्या बाळापासून दूर करण्यात आले. अक्षयलादेखील असेच भासवण्यात आले की रमाने तिची जबाबदारी झटकली आहे. रमा व अक्षय यांच्यात जाणूनबुजून दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्यात रमाचा मित्र साईने रमाला साथ दिल्याचे दिसले. याचाच फायदा घेऊन साई व रमा यांच्यात काहीतरे नाते आहे, असे इरावतीने अक्षयला पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.
‘मुरांबा’ मालिकेत ७ वर्षांचा लीप!
‘मुरांबा’ मालिकेच्या प्रोमोमध्ये इरावतीने रमाकडून घटस्फोटाचे पेपर आल्याचे सांगत ते अक्षयला दिले. त्यानंतर अक्षयने रागात रमाच्या सगळ्या आठवणी नष्ट केल्याचे दिसले. अक्षयला घटस्फोटाचे पेपर दिल्याचे पाहायला मिळाले.
स्टार प्रवाह वाहिनीने ‘मुरांबा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मालिका सात वर्षे पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षय आकाशात बघत आहे. रमा-अक्षयची मुलगी मोठी झाली आहे. ती अक्षयला बाबा अशी हाक मारत येते. ती आल्यानंतर अक्षय तिला उचलून घेतो. ती अक्षयला विचारते की तू आईला बघत होतास ना? त्यावर अक्षय आश्चर्याने, आई? असे म्हणतो.
त्यावर त्याची मुलगी त्याला म्हणते की सगळे मला म्हणतात की आई तारा झालीये. तितक्यात तिला आकाशातील तारा तुटताना दिसतो. ती उत्साहाने म्हणते की बाबा, तारा तुटला. म्हणजे आई खाली येत आहे. ती आनंदात ओरडत असतानाच अक्षय मनातल्या मनात म्हणतो की, बाळा कसं सांगू तुझी आई परत येणार नाही.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की रमा दुसऱ्या कुठल्यातरी ठिकणी आहे. तिने छान गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. चेहऱ्यावर मंद हसू, मोकळे केस अशी रमादेखील आकाशात बघत आहे. ती पाचगणीमध्ये असल्याचे त्यावर लिहिले आहे. या प्रोमोमध्ये ऐकायला मिळते की, सात वर्षांनंतर जुन्या नात्याचा सुरू होतोय नवा प्रवास. हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने सात वर्षांनंतर अशी कॅप्शन दिली आहे.
आता रमा आणि अक्षयची भेट होणार का, रमा पाचगणीमध्ये का आहे, हे येणाऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.