स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. सोशल मीडियावरही ते कायमच सक्रिय असतात. आताही त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियाद्वारे आपलं मत स्पष्टपणे मांडणं मिलिंद यांना आवडतं. आताही त्यांनी केलेल्या फोटोशूटदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळेचं किती महत्त्व असतं हे त्यांनी सांगितलं आहे. मिलिंद म्हणाले, “वेळ कोणासाठी थांबत नाही आणि असं म्हणतात की, वेळेतच सगळं व्हायला हवं. एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही. दुर्दैव असं आहे की, खूप कमी लोकांना वेळेचं महत्त्व आहे”.

आणखी वाचा – Video : प्रसाद ओकबरोबर परदेशात काय घडलं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, अभिनेता म्हणतो, “जगाच्या कानाकोपऱ्यात…”

“बऱ्याचशा लोकांना स्वतःच्या तर नाहीच पण दुसऱ्याच्याही वेळेची अजिबात किंमत नसते. खरंतर वेळ पाळणं हा एक वेगळाच गहन विषय आहे. यावर तर मला खूपच बोलायचं आहे, पण सविस्तरपणे नंतर… पण आज उत्तम जगणं म्हणजे काय? याविषयी थोडं बोलावसं वाटतं. खूप लोकांना असं वाटतं की, आपल्याकडे खूप वेळ आहे. पण खरंतर खूप वेळ हा कोणाकडेच नसतो. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं. त्यांच्याकडे बघून छान वाटतं. आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत असं सतत वाटत असतं”.

आणखी वाचा – गरोदरपणात सुप्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागतोय ‘या’ आजाराचा सामना, आता ‘अशी’ झाली आहे अवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“केरलाचे मोहनलाल यांच्याबरोबर मी काम केलं आहे. मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो आहे असं वाटतं. तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं. ज्या वेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं ८५. या वयातसुद्धा ते फार ग्रेसफुल होते. मी निळू भाऊ यांच्याबरोबर ज्या वेळेला काम केलं त्यावेळीही त्यांचं वय होतं ७७-७८. खूप ग्रेसफुल होते ते. पंडित जसराज यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते. वयाच्या नव्वदीमध्येसुद्धा ते इतकं सुरेख गायचे, स्वर्गातून परमेश्वर येऊन त्यांचं गायन ऐकत बसत असतील असं वाटायचं. माझे वडील श्री श्रीराम गवळी वयाच्या ८४व्या वर्षात अगदी उत्साहाने काम करतात. मला प्रोत्साहनासाठी दुसरीकडे कुठेही बघायची गरजच नाही”. मिलिंद यांच्या या पोस्टचं नेटकरी कौतुक करत आहेत.