scorecardresearch

Premium

“आमच्या मजल्यावर फायर अलार्म वाजला, आम्ही धावत आलो अन्…” मिलिंद गवळींनी सांगितला ‘तो’ किस्सा

मिलिंद गवळी हे त्यांच्या कुटुंबाबरोबर नव्या घरात राहायला गेले आहेत.

milind gawali
मिलिंद गवळी

‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. सध्या या मालिकेत अनेक ट्वीस्ट येताना दिसत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच मिलिंद गवळी हे त्यांच्या कुटुंबाबरोबर नव्या घरात राहायला गेले आहेत. त्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या जुन्या घरासाठी आणि तेथील रहिवाशांसाठी एक पोस्ट लिहिली आहे.

मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. मिलिंद गवळी हे ठाण्यातील एका प्रसिद्ध सोसायटीमध्ये राहत होते. मात्र आता ते नवीन घरात राहायला गेले आहे. यावेळी त्यांनी तिकडच्या आठवणी आणि केलेल्या गंमतीजमतींबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्याबरोबर त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “…म्हणून लोक आजारी पडत असतील का?” मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

मिलिंद गवळींची पोस्ट

“Living In Harmony, हार्मनी म्हणजे unity, ऐक्य, एकोपा, स्वरांची संगती आणि नावासारखीच ही हार्मनी नावाची ठाण्यामध्ये बिल्डिंग आहे जिथे आम्ही जवळजवळ तीन वर्ष राहत होतो. २ आठवड्यापूर्वी मी Harmony Signature Towers सोडलं, निघताना आम्ही खूप सुखद आठवणी आणि प्रेम घेऊन निघालो, असं म्हटलं जातं की फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारच्यांचा काहीही संबंध नसतो, कोणी कोणाला फारसे ओळखत नसतात, पण इथे तो अपवाद होता, समोरच्या फ्लॅटमध्ये राव फॅमिली राहायची, काही दिवसातच मी त्यांना दिसल्या दिसल्या प्रकाश राव यांनी माझा हात धरला “ तुमने सिरीयल मे मेरी बीवी को बहुत रुलाया है” असं म्हणत मला त्यांच्या घरीच नेलं, आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या कुटुंबाचा सदस्यच करून घेतला, त्यांच्या पत्नी विद्याताई South Indian असूनही त्या दररोज सकाळी सहा वाजता “आई कुठे काय करते” बघायच्या, त्यामुळे त्यांचा तसा माझ्याशी परिचय होताच, Indian Oil आणि Bharat Petroleum मधून रिटायर झालेलं हे couple , full of life आहेत, त्यांचा मुलगा popular fitness coach पुनीत , त्याची बायको पल्लवी आणि त्यांची गोड अशी चिमुकली कियू .

आमच्या दोघांच्या शेजारचा फ्लॅट कदम फॅमिलीचा, एक दिवस आमच्या मजल्यावर fire Alarm वाजला, आम्ही धावत बाहेर आलो, मजल्यावर धूर बघितला, तर गौरी कदम जी खूप अध्यात्मिक आहे तिने धूप केलं होतं, fire Alarm वाजल्यावर ती सॉरी म्हणत बाहेर आले, त्या दिवसापासून कदम कुटुंबीयांशी कनिष्ठ संबंध निर्मान झाले , लवकरच Indonesia ला राहणारे गौरीचे आई-वडील उज्वलाताई आणि अरुणजी आले, उज्वला ताईंनी तर माझी “तू अशी जवळी रहा “ही सिरीयल पण पूर्णपणे बघितले होती.

मग काय त्यानंतर त्या मजल्यावर कोणाचेही दार कधीही बंदच नसायचं, एकमेकांच्या घरांमध्ये एकमेकांच्या भाज्या ,चटण्या लोणची, पुलाव, इडल्या,दाबेली,कॉफी यांचं येणं जाणं सूरू झालं, उज्वला ताईंच्या आई ज्यावेळेला त्यांच्याकडे राहायला यायच्या, तेव्हा आमच्या गाण्याच्या ही मैफिली सुरू व्हायच्या, कुठलाही सण किंवा महोत्सव साजरा करावा तर पल्लवी राव हिने, खूपच creative, आणि उत्साही आहे ती, Meditation करावं तर गौरी कदम हिच्या guidance ने, अरुण कदम हे इतके मोठे व्यक्ती,त्यांनी अनेक देशांमध्ये बँका आणि कंपनीन्या scratch पासून उभ्या केल्या आहेत , उत्कृष्ट चित्रकार, संगीताची खूप गोडी, Sports . मस्तच गेले ते दिवस. उषा Aunty आणि family, bldg मधल्ये लाहान पोरं, त्यांच्या खूपशा गोड आठवणी घेऊन हार्मोनी सोडून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आहे.” असे मिलिंद गवळींनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : अभिज्ञा भावेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा इन्फ्लुएन्सरवर संताप, म्हणाली “फक्त लोकप्रिय चेहरा…”

दरम्यान मिलिंद गवळींच्या या पोस्टवर तिथे राहणाऱ्या अनेकांनी कमेट केली आहे. “आम्हाला तुमची नक्कीच आठवण येईल. पण आम्हाला खात्री आहे की तुम्ही जिथे कुठे जाल तिथे आनंद पसरवाल”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “काहीही म्हणा..पण, तुम्ही लिहून वर्णन फार सुरेख करता!!” असे म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×