अभिनेत्री गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यामध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती. त्यातील अभिनेता अभिषेक देशमुख व तिची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस पडली होती. परंतु, नंतर अभिनेत्रीची या मालिकेतून एक्झिट झाली. त्यानंतर अभिनेत्री ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत झळकली होती. गौरी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. दैनंदिन जीवनातील घडामोडींसह ती अनेक भन्नाट रील्स शेअर करीत असते.

अशातच अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत ती म्हणाली, “एलिगेंझप्रोफेशनल (Eleganzprofessional) या नामांकित ब्रँडने माझे पैसे थकवले आहेत. मी गेले ५५ दिवस वेळोवेळी वेधांशी (मध्यस्थी करणारी व्यक्ती)ला संपर्क साधत आहे. परंतु, या ब्रँडचे मालक गोविंद चौधरी यांनी अनेकदा पैसे देतो म्हणत अजूनही ते दिलेले नाहीत. माझ्यासह अजूनही इतर इन्फ्लुएन्सरचेही पैसे त्यांनी थकवले आहेत.”

गौरीनं पुढे अजून एक स्टोरी शेअर करीत ‘एलिगेंझप्रोफेशनल’ या ब्रँडच्या मालकाने तिला फोन करून धमकी दिल्याचं म्हटलं आहे. त्यामध्ये ती म्हणाली, “मी पूर्वीच्या स्टोरीमध्ये असं म्हटलं होतं की, गोविंद यांनी मला फोन करून एका दिवसात माझे पैसे देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मी ती स्टोरी काढली होती. परंतु, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या टीमनं सर्व कोलॅब्रेशन काढलं आणि त्यासाठी मला दोष दिला. नंतर त्यांनी मला फोन करुन धमकी दिली की, तुझं लोकेशन ट्रॅक करून तुला त्रास देऊ. त्यासह तुझ्या घरी पोलिस पाठवतो, असंही ते म्हणाले.” गौरी सोशल मीडियावर सक्रिय असून, तिचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा विविध ब्रँडसह जाहिराती करीत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अभिनेत्री गौरी कुलकर्णीची स्टोरी

गौरी कुलकर्णी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे. त्यामध्ये तिने साकारलेल्या गौरी या पात्राला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनयाव्यतिरिक्त गौरीने नुकताच तिचा नखरेल हा ब्रँड सुरू केला आहे.