अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाचे पात्र साकारुन घराघरात पोहोचली. अश्विनीचा चाहता वर्गही मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अश्विनीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने शोक व्यक्त केला आहे.

अश्विनीचा मानलेला भाऊ मंगेश यांचं निधन झालं आहे. मंगेशबरोबरचा फोटो शेअर करत अश्विनीने भावूक पोस्ट लिहीली आहे. “एखादा माणूस आपला असतो म्हणजे नेमकं काय? त्याच्या चांगल्या गोष्टी बरोबरच वाईट गोष्टी स्वीकारणे म्हणजे असतो का आपला माणूस? प्रत्येक माणूस हा स्वतःचा असा प्रवास करत असतो. येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याचा प्रवास ठरतो, ध्येय ठरते”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> “१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप

“मंगेशची ‘दिदू’ झाले पण कदाचित त्याला हवा असणारा वेळ देवू शकले नाही. बहीण म्हणून कमी पडलेच. आपला माणूस म्हणून त्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पण कदाचित वाईट गोष्टींसहित स्वीकारता आलेच नाही. माणूस निघून गेला की समजते की गेला तो माझा होता, त्याच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली, त्याला महत्व होते, मला अजून थोडा वेळ हवा होता, मी घेतले असते समजून…पण वेळ पुढे सरकलेला असतो. मंगेश…आम्हाला थोडा वेळ दिला असता तर कदाचित आम्ही दोघांनी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. मनावरचे ओझे जगू देईल का आम्हाला…भावपूर्ण श्रद्धांजली”, असं म्हणत अश्विनीने खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा >> Video: प्रमोशनदरम्यान कतरिना कैफ ‘हाऊ इज द जोश’ म्हणाली अन्…; व्हायरल व्हिडीओ पाहा

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनीने मालिकांसह चित्रपटांतही काम केलं आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत तिने साकारलेली ‘रानू अक्का’ ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.