‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. त्यामुळे ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकाविश्वात ही लोकप्रिय मालिका ठरली असून टीआरपीच्या शर्यतीतही पुढे आहे. अजूनही या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. अशातच या मालिकेत काम केलेल्या एका अभिनेत्रीला नवरा मिळाल्याचं समोर आलं आहे. याबाबत तिनं स्वतः नुकतीच इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – “जो भी होगा देखा जायेगा” म्हणत एव्हरग्रीन नारकर कपलनं नवा व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले…

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक कलाकारने साकारलेली भूमिका ही घराघरात पोहोचली आहे. मग अरुंधती असो किंवा अनिरुद्ध आणि संजना असो प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षक तितकंच प्रेम करत आहेत. अशी एक प्रेक्षकांना आवडणारी भूमिका होती, गौरीची. गौरी म्हणजे यशची प्रेयसी; तिनं या मालिकेतून काही महिन्यापूर्वीच एक्झिट घेतली आहे.

हेही वाचा – “आई-बाबा दोघेही गेले…”; अभिनेते अजिंक्य देव यांची नवी पोस्ट, रमेश देव आणि सीमा देव यांचे जुने फोटो केले शेअर

यश आणि गौरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. या दोघांचं लग्न सुद्धा होणार होतं. पण अचानक गौरीनं यशच्या आयुष्यातून एक्झिट घेतली आणि ती कायमची अमेरिकेला निघून गेली. त्यामुळे या मालिकेत गौरी साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णीची सुद्धा कायमची एक्झिट झाली. नुकताच गौरीनं ‘नवरा मिळाला’ अशी पोस्ट लिहीत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘ताली’मधील सुव्रतच्या लूक टेस्टची सासूबाईंनी सांगितली गंमत; शुभांगी गोखले म्हणाल्या, “साडी आणि ब्लाउज…”

या व्हिडीओमध्ये गौरीबरोबर पुष्कराज चिरपुटकर पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला गौरी म्हणते की, ‘शूट कर, शूट कर.’ मग पुढे जाऊन पुष्कराजला पकडून म्हणते की, ‘नवरा मिळाला.’ त्यावर पुष्कराज म्हणतो, ‘नवरा? मी?’ तर गौरी म्हणते, ‘हो. तूच किरकोळ नवरा. चल नाट्यगृहात’ यावर पुष्कराज म्हणतो, ‘नाट्यगृहात काय आहे?’ गौरी म्हणते, ‘तुझा प्रयोग आहे ना? ‘किरकोळ नवरे” मग पुष्कराज म्हणतो, ‘आता?’ यावर गौरी म्हणते, ‘हो, मी तिकिट काढलंय. चल.’

हेही वाचा – नाकतोडे, रेशीमकिडे, रातकिडे खातानाचा अभिनेता सुव्रत जोशीचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “हा जेवणाचा….”

असा हा मजेशीर व्हिडीओ गौरीनं शेअर करत मजेशीर कॅप्शन सुद्धा लिहिलं आहे की, “नवरा मिळाला……पण नाटकं करतोय….आता भेटूच हॉलमध्ये….म्हणजे नाट्यगृहात”

हेही वाचा – “स्मृतिभ्रंश हा एक असा आजार…” सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या सासूबाई…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘किरकोळ नवरे’ हे सध्या रंगभूमीवर सुरू असलेलं लोकप्रिय नाटक आहे. या नाटकात अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता सागर देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘किरकोळ नवरे’ या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सागर देशमुखनेच सांभाळली आहे.