‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शोमध्ये एकमेकांचे घट्ट मित्र असलेले एमसी व अब्दू रोझिक यांच्यात सध्या वाद सुरू आहेत. अब्दुने एमसीसह त्याची मैत्री तुटली असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अब्दुने त्यावर काही आरोपही केले. एमसी माझ्याविरोधात अफवा पसरवत असल्याचा आरोप अब्दुने केला. त्याबरोबरच एमसी फोनही उचलत नसल्याचं अब्दुचं म्हणणं होतं. तर अब्दुने त्याच्या गाण्याचं प्रमोशन करण्यास सांगितल्याचं एमसी म्हणाला होता. आता या सगळ्या प्रकरणावर एमसीच्या जवळच्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

अब्दुच्या टीमकडून मध्यंतरी एक पत्रक जारी करण्यात आलं होतं. या पत्राद्वारे अब्दुने एमसीवर आरोप केले होते. “११ मार्चला अब्दु व स्टॅन दोघेही बंगळूरमध्ये होते. अब्दूने स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, अब्दुबरोबर कॉन्सर्ट करण्यास स्टॅन इच्छुक नसल्याचं त्याच्या मॅनेजरने सांगतिलं. त्यानंतर अब्दुने तिकीट काढून स्टॅनच्या कॉन्सर्टला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण स्टॅनने त्याच्या मॅनेजरला अब्दुला बाहेर काढण्याबरोबरच त्याच्या कारचं पॅनल तोडून नुकसान करण्यास सांगितलं”. असं अब्दू म्हणाला.

इतकंच नव्हे तर अब्दुने स्टॅनच्या आईबरोबर फोटो न काढल्याने तो नाराज असल्याचं मंडलीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं. आता एमसीच्या टीमने याबाबत भाष्य केलं आहे. एमसीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, “‘बिग बॉस’ संपल्यानंतर एमसी त्याच्या टूरमध्ये व्यग्र झाला आहे. तो एक स्वतंत्र्य कलाकार आहे. त्याने नेहमीच एकट्याने परफॉर्म केलं आहे”.

आणखी वाचा – मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एमसी कोणाबरोबरच एकत्रित परफॉर्म करू इच्छित नाही. बंगळुर कॉन्सर्टदरम्यान अब्दूचा अपमान करणं, तसेच त्याच्या कारचं पॅनल तोडणं या सगळ्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. कोण असं का करेल? हे सगळे आरोप खोटे आहेत”. आता या सगळ्या प्रकरणावर पुढे अब्दु काही बोलणार का हे पाहावं लागेल.