Abhijeet Sawant Daughter Dance On Shaky Song : मराठीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘काली बिंदी’ या गाण्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं आणि आता त्याचं नवीन गाणं ‘शेकी’ सर्वत्र गाजत आहे. ‘हिंदी बिग बॉस’ गाजवलेली ईशा मालवीय असलेलं हे संजू राठोडचं हे गाणं २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि अवघ्या दोनच महिन्यांत या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

संजूच्या या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यूट्यूबवरही या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत. इन्स्टाग्रामवर तर हे गाणं सध्या बरंच ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर थिरकत आहेत. तसंच बरेच सेलिब्रिटीही संजूच्या या गाण्यावरच डान्स करत आहेत. कलाकार मंडळींनी संजूच्या ‘शेकी’ गाण्यावर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अशातच गायक अभिजीत सावंतच्या लेकीनेही या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला आहे. अभिजीतच्या धाकट्या लेकीने ‘शेकी’ या गाण्यावर हटके डान्स केला आहे. गायक अभिजीत सावंत सध्या स्वित्झरलँडमध्ये पत्नी आणि दोन्ही मुलींसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अभिजीत स्वित्झरलँडमधील ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहे. अशातच त्याने लेकीचा ‘शेकी’वरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिजीत सावंतच्या लेकीच्या डान्सचं संजू राठोडकडून कौतुक

संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याच्या हुकस्टेप्सवर अभिजीतच्या लेकीने अगदी हुबेहुब डान्स केला आहे. या व्हिडीओमधील अभिजीतच्या लेकीचा गोड डान्स आणि चेहऱ्यावरील क्युट हावभाव सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, अभिजीत सावंतने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. इतकंच नव्हे तर संजू राठोडनेही या व्हिडीओवर कमेंट करत या डान्सला दाद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस मराठी’ फेम गायक अभिजीत सावंतबद्दल थोडक्यात

दरम्यान, आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारा अभिजीतने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस’मधील त्याच्या खेळाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात त्याला भेटण्यासाठी त्याच्या आहना आणि स्मिरा या दोन्ही लेकी भेटायला आल्या होत्या. यावेळी त्यांच्या कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. अशातच आता अभिजीतच्या लेकीच्या डान्स व्हिडीओचीही सर्वत्र चर्चा आहे.