Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Wedding : मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार येत्या काही दिवसात लग्नगाठ बांधत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी साखरपुडा, लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. यादिवशी ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गावकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा साखरपुडा देखील पार पडला होता. यानंतर दोघांचं केळवण झालं, त्यांची हळद अन् मेहंदी सुद्धा नुकतीच पार पडली. आज ( २६ नोव्हेंबर २०२४ ) हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहेत.
अभिषेक आणि सोनाली लग्न केव्हा करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रेक्षकांच्या लाडक्या श्रीनूने ( मालिकेतील नाव ) तो लवकरच लग्न करेल असं सांगितलं होतं. आता त्याच्या लग्न सोहळ्याचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
सोनाली आणि अभिषेक यांचा विवाहसोहळा मालवणात पार पडला आहे. दोघांच्या लग्नातील पहिला फोटो अभिनेता पियुष रानडे याने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. सोनाली-अभिषेकने लग्न सोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. नाकात नथ, हिरवा चुडा, सुंदर साडी या लूकमध्ये नववधू अतिशय सुंदर दिसत आहे.
अभिषेक गावकरबद्दल…
‘सारं काही तिच्यासाठी’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेमुळे अभिनेता ( Abhishek Gaonkar ) सर्वत्र चर्चेत आला. यामध्ये अभिषेक गावकरने ‘श्रीनू’ ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, तरीही त्याच्या सगळ्या चाहत्यांना अभिषेकच्या लग्नाबद्दल उत्सुकता होती.
हेही वाचा : Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने घेतली मैत्रीची परीक्षा; करणवीर मेहरा, विवियनसह ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

अभिषेकची पत्नी काय काम करते?
अभिषेक गावकरची होणारी बायको सोनाली गुरव ही सोशल मीडियावर विविध मजेशीर रील्स व्हिडीओ बनवत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या रील्सला मिलियनच्या घरात व्ह्यूज असतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र होते. आता अभिषेक ( Abhishek Gaonkar ) आणि सोनाली साता जन्माचे सोबती झाले आहेत.