अभिनेता कुशाल टंडन व गौहर खान यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करून इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. एकेकाळी रिलेशनशिपमध्ये राहिलेले गौहर व कुशाल आता एकमेकांचं तोंड बघणंही पसंत करत नाही. चाहत्यांच्या या लाडक्या जोडप्याने एका रिअॅलिटी शोमध्ये प्रेमाची कबुली दिली होती आणि नंतर वर्षभराने त्यांचं ब्रेकअप झालं होतं.

२०१३ मध्ये गौहर खान आणि कुशल टंडन पहिल्यांदाच रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये भेटले होते, तिथे त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. गौहर बिग बॉसच्या या पर्वाची विजेती ठरली होती. या जोडप्यातील केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत होती. चाहते प्रेमाने या दोघांना ‘गौशाल’ म्हणायचे. बिग बॉस संपल्यानंतरही हे दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र, एके दिवशी, कुशालने गौहरपासून वेगळे झाल्याची माहिती ट्वीट करून दिली. त्याच्या या पोस्टमुळे दोघांच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता.

गौहर खान व कुशाल टंडनचं ब्रेकअप का झालं?

गौहर व कुशाल साखरपुडा करणार, अशा चर्चा एकीकडे होत असतानाच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, गौहरपासून ब्रेकअपची घोषणा केल्यानंतर कुशालने त्याच्या एका पत्रकार मित्राला वेगळं होण्याचं कारण सांगितलं होतं. धर्माच्या मुद्द्यावरून गौहरबरोबर ब्रेकअप झालं, असं कुशाल म्हणाला होता.

“गौहर व माझ्या नात्याचा प्रवास खूप रोमँटिक होता, पण आता मी पुन्हा प्रेमात पडेन असं मला वाटत नाही. ती खूप चांगली मुलगी आहे. मी आमच्यातील काही बिनसलेल्या गोष्टी सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आम्हाला सगळं संपवावं लागलं. कारण आम्ही एकमेकांसाठी परिपूर्ण नव्हतो,” असं कुशाल म्हणाला होता.

गौहने धर्मांतर करायला सांगितलं – कुशाल टंडन

“गौहरने मला माझा धर्मांतर करायला सांगितलं होतं, पण ते माझ्यासाठी कधीच शक्य नाही. प्रेम खूप महत्त्वाचे असले तरी ते सर्वस्व नाही. आम्ही फोनवर आमचं नातं संपवलं आणि आता मी माझ्या कुटुंबाबरोबर लखनऊला आहे,” असं कुशालने म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ब्रेकअपनंतर कधीच गौहर व कुशाल एकत्र दिसले नाही. ब्रेकअपनंतर काही वर्षांनी गौहरने जैद दरबारशी लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगा असून गौहर आता दुसऱ्यांदा गरोदर आहे. लवकरच ती दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे.