‘इश्कबाज’ फेम टीव्ही अभिनेता नकुल मेहता लग्नानंतर १३ वर्षांनी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. नकुलच्या घरी दुसऱ्यांदा चिमुकल्या सदस्याचे आगमन झाले आहे. नकुलची पत्नी जानकी पारेखने एका मुलीला जन्म दिला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली आहे.

नकुल मेहता व जानकीला एक मुलगा आहे. आता मुलीचा जन्म झाल्याने त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं आहे. नकुलने मुलाचा त्याच्या लाडक्या बहिणीबरोबरचा फोटो, त्याचा लेकीबरोबरचा व पत्नीबरोबरचा फोटो असे तीन फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टला नकुलने एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे.

यामध्ये नकुल मेहताने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा सुफी त्याच्या बहिणीला मांडीवर घेऊन बसलेला दिसतो. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये नकुल स्वतः त्याच्या लाडक्या लेकीकडे पाहतोय आणि तिसरा फोटो नकुलने ऑपरेशन थिएटरमधून शेअर केला आहे. यात तो आणि त्याची पत्नी कोणालातरी व्हिडीओ कॉल करताना दिसत आहेत.

नकुलने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “अखेर ती आली. सुफीला अखेर तिची रूमी भेटली. आमची मनं भरली आहेत. १५ ऑगस्ट २०२५… प्रेम शोधणं हा टास्क नाही, तर फक्त तुमच्या आत असलेल्या सर्व अडथळ्यांना शोधून त्याविरोधात उभं राहणं आहे.”

नकुल मेहताची पोस्ट-

नकुल व जानकीने ही गोड बातमी दिल्यावर चाहते व सेलिब्रिटी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सर्वजण नकुल मेहता आणि जानकी पारेख यांचे अभिनंदन करत आहेत. दृष्टी धामी, सनाया इराणी, दिया मिर्झा, अरिजीत तनेजा, गौहर खान, करण ग्रोव्हर, नीती मोहन यांनी नकुलच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

नकुल व जानकी यांनी २०१२ साली लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली आहेत. नकुल मेहता मागील बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. त्याचे चाहते त्याला टीव्हीवर पाहण्यास उत्सुक आहेत, पण नकुल कुटुंबाबरोबर वेळ घालवतोय. त्याने या वर्षी जूनमध्ये एक फोटो शेअर केला होता आणि त्याचे तीन जणांचे कुटुंब आता चौकोनी होणार आहे, अशी गुड न्यूज दिली होती. आता तो बाबा झाला असून गोंडस लेकीच्या आगमनाने त्याचं कुटुंब पूर्ण झालं आहे.