सध्या ऑनलाइनचा जमाना आहे आणि आपण सर्वजण अनेकदा ऑनलाइन खरेदी करतो. ऑनलाइन खरेदी करताना आतापर्यंत अनेकांना वाईट अनुभव आले आहेत. तर आता नुकतीच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याची फसवणूक झाली असल्याचं त्याने सांगितलं.

अभिनेते निखिल रत्नपारखी सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असतात. त्यांनी नुकताच एक पेन ड्राईव्ह ऑनलाइन खरेदी केला. मात्र त्या खरेदीच्या वेळी त्यांची फसवणूक झाली असल्याची माहिती नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत दिली आणि त्यांना आलेला अनुभव सांगितला.

आणखी वाचा : हर्षदा खानविलकरांनी घातले प्राजक्ता माळीच्या ‘प्राजक्तराज’ ब्रँडचे दागिने, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “हे दागिने खूप…”

निखिल रत्नपारखी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत करत लिहिलं, “मी ॲमेझॉनवरून एक पेन ड्राईव्ह ऑर्डर केला होता. तो डॅमेज होता म्हणून मी त्वरित रिप्लेसमेंट ऑर्डर दिली. तो घेऊन जायला कोणीही आलं नाही. म्हणून त्याविषयी मी चौकशी केली तर टाईम लिमिट उलटून गेली असं ते सांगतात. वास्तविक ऑर्डर देऊन सहा दिवस सुद्धा झाले नाहीत. आम्ही काही करू शकत नाही. यापुढे ते काही बोलतच नाहीयेत. आणि आता फायनली ते रिप्लेसमेंट देत नाहीयेत (पेन ड्राईव्ह महाग आहे) असे हे ॲमेझॉनवाले चोर आणि फसवणारे लोक आहेत. विकत घेतलेल्या प्राॅडक्टची काहीही गॅरंटी नाही. निव्वळ फालतूपणा आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे. जीवाला थोडे कष्ट पडतील पण ॲमेझॉनवरून खरेदी बंद.”

हेही वाचा : शिवानी रांगोळेने सांगितला कविता मेढेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “एकत्र सीन करताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता त्यांच्या या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. या पोस्टवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. तरी आज बरोबर अनेकांनी त्यांच्या कमेंट मध्ये त्यांना आलेलाही वाईट अनुभव सांगितला आहे.