जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मागच्या रविवारी (९ जून) वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून ९ जण ठार झाले. अभिनेता पंकित ठक्कर जम्मू- काश्मीरमधील रियासी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावला. त्यानेच याबाबत खुलासा केला आहे. तो दर्शनासाठी गेला होता, पण त्याआधीच त्याला हल्ल्याची माहिती मिळाली.

‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना पंकितने सांगितलं की तो कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराकडे चालत जाणार होता. मात्र, जाण्याआधीच त्याला हल्ल्याची माहिती मिळाली आणि तो आपल्या हॉटेलमध्ये परतला. हा हल्ल्यामुळे त्याला आपली यात्रा पूर्ण करता आली नाही. “हा हल्ला भयंकर होता. मला त्या धक्क्यातून सावरून त्याबद्दल बोलायला इतके दिवस लागले. मी लोकांना त्या गर्दीत, दुःखात पाहिलंय. ते सगळं खूप भयावह होतं आणि ते पाहून मला खूप दुःख झालं, माझा संताप अनावर झाला. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले दहशतवादी हल्ले, यामध्ये निष्पाप लोकांनी जीव गमावणं आणि या प्रदेशात वाढलेला तणाव पाहणं खूप निराशाजनक आहे,” असं पंकित म्हणाला.

Donald trump and jagannath rathyatra connection
“भगवान जगन्नाथांनी वाचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण”; काय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि भगवान जगन्नाथ रथयात्रेचे कनेक्शन?
Thomas Matthew Crooks trump attack
ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा शूटर थॉमस मॅथ्यू क्रुक्स कोण होता? त्याने हा हल्ला कसा केला? या हल्ल्यामागचे कारण काय?
Israel air strike on gaza news in marathi
Israel Air Strike on Gaza : गाझामध्ये मोठा नरसंहार! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू; ‘या’ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केलं होतं लक्ष्य
Masoud Pezeshkian reformist president elected by Iranian people overturning the established system will give new direction to Iran
कर्मठ व्यवस्थेस वाकुल्या दाखवत इराणी जनतेने निवडला सुधारणावादी अध्यक्ष… मसूद पेझेश्कियान इराणला नवी दिशा देतील का?
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Joe Biden Donald Trump United States presidential election democratic contenders replace biden
बोलताना अडखळतात, चालताना धडपडतात! बायडन यांची उमेदवारी गेली तर या सहांपैकी कुणालाही मिळू शकते संधी!
west bengol
पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!
Violent Protests in Kenya burnt parliament tax bill protests in Kenya
डेटा ते डायपर सगळंच महागलं! केनियाच्या लोकांनी ‘या’ कायद्यामुळे पेटवली संसद

“एक गोष्ट मी अजूनही…”, तीन वर्षांनंतर मंदिरा बेदीने पतीच्या निधनाबद्दल सोडलं मौन; हार्ट अटॅकने झाला राज कौशलचा मृत्यू

तो पुढे म्हणाला, “या क्रूर हल्ल्यामध्ये ज्या लोकांनी जीव गमावले, त्या सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांचा विचार करून दुःख होतंय. अशा हिंसाचारामुळे लोकांचे जीवन उध्वस्त होत आहे. जम्मू आणि काश्मीर खूप सुंदर आहे, पण अशा घटनांमुळे या ठिकाणाची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. जम्मूतील रियासी इथं झालेला हा हल्ला आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतोय की आपण अशा भ्याड आणि वाईट हल्ल्यांविरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे.”

ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या

जम्मूमधील या हल्ल्यानंतर पंकितने तेथील प्रशासनाला सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून अशा लोकांना पकडून त्यांना शिक्षा होईल. अभिषेक कुमार, कपिल शर्मा, हिना खान, रुपाली गांगुली आणि अली गोनी यांच्यासह अनेक टीव्ही कलाकारांनी जम्मूमधील हल्ल्याचा निषेध केला आहे. कामाबद्दल बोलायचं झाल्यास पंकित अलीकडेच ‘बरसातें’ मालिकेत दिसला होता.