टीव्ही जगतात आज एक धक्कदायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं आज निधन झालं आहे. त्याच्या आकस्मिक निधनाने टीव्ही जगताला आणखी एक धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने सर्वजण हळहळले. दरम्यान, जिममध्ये व्यायाम करत असतानाच सिद्धांत याला हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धांत सूर्यवंशीच्या मित्रांनी सांगितले की, ‘अभिनेता गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता.’

सिद्धांताच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होत आहेत. टीव्ही जगतात कलाकार शोक व्यक्त करत आहेत. सिद्धांत सूर्यवंशीची मैत्रीण विश्वप्रीत कौरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तो तणावाखाली असल्याची कबुली दिली. तिला जेव्हा विचारलं की “सिद्धांत तणावात होता का?” तेव्हा तिने उत्तर दिले जे धक्कादायक आहे ती म्हणाली, “इथे कोणता अभिनेता तणावाखाली नाही? सिद्धांत तणावात होता. हे शहरच खूप चिंताजनक आहे. आम्ही आज भेटणार होतो त्याने कबूलदेखील केले होते. तो माझा खूप चांगला मित्र होता.”

“माझ्या तीन जीवनावश्यक…” जिममध्ये व्यायाम करताना निधन झालेल्या सिद्धांत वीर सूर्यवंशीची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल

सिद्धांतने ममता, कुसुम, कृष्ण अर्जुन, कसोटी जिंदगी की या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सिद्धांतचं खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नसली तरी त्याने पहिले स्टार इंडियाशी संबंधित असलेल्या इराबरोबर लग्न केले होते. त्यांचे लग्न १५ वर्षे टिकले आणि नंतर दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगीदेखील आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इरापासून विभक्त झाल्यानंतर, सिद्धांतने सुपरमॉडेल अॅलेसिया राऊतबरोबर लग्न केले एका कॉमन मित्राच्या साहाय्याने त्यांची ओळख झाली मग त्याचे रूपांतर प्रेमात झाले आणि मग दोघांनी लग्न केले. अॅलेसिया राऊत हे फॅशन विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. तिने फियर फॅक्टर या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.