‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत अभिनेता सुमीत पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सुमीतदेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सुमीतने नुकताच पत्नी मोनिकाबरोबरचा फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने पोहोचला कोकणातील गावी, त्याचं टुमदार कौलारू घर पाहिलंत का?




सुमीत व मोनिकाच्या पहिल्या भेटीला एक वर्ष झालंय, त्यानिमित्ताने सुमीतने पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने मोनिकाशी पहिल्यांदा फोनवर बोलल्याची आठवण ते लग्न आणि पहिल्या भेटीनंतरचा एका वर्षाचा प्रवास सांगितला आहे. पाहुयात सुमीतने पोस्टबरोबर लिहिलेलं कॅप्शन –
मी : हॅलो मोनिका, मी सुमित.
तु : हा हाय,
मी : काय करतेयस?
तु : काय नाही काम चालू आहे.
मला आठवतंय हे आपलं पहिलं बोलणं, आज बरोबर एक वर्ष झालं त्या गोष्टीला. एकमेकांचे बायोडाटा आपल्या घरच्यांनी पहिले, आपल्याला ते पाठवले. एकमेकांचे नंबर एक्सचेंज झाले अन् बोलायला सुरवात. मग काय एकमेकांच्या आवडी निवडी, पसंत नापासंत, घरी कोण कोण असतं ह्या सगळ्या गोष्टी बोललो. मग मेसेज, नंतर व्हिडीओ कॉलवर बोलायला लागलो. आपण भेटलो, आपल्या घरचे एकमेकांना भेटले आणि बघता बघता सहा महिन्यांत लग्न पण होऊन गेलं. ह्या एका वर्षात आपण खुप साऱ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्यात, आपली सुख दुःख, सगळं काही. एक वर्ष कसं निघून गेलं कळलं पण नाही, असं वाटतंय गेल्या एक दोन महिन्याची गोष्ट आहे ही. तुझ्यामुळे अजुन एक खुप छान फॅमिली मिळाली. तु खुप कमाल आहेस मोना, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी, थँक्यू सो मच माझ्या आयुष्याचा जोडीदार होण्यासाठी. मला माहितेय आपण कुठे फिरायला नाही गेलोय माझ्या कामामुळे, पण तिथे सुद्धा तु मला समजून घेतलंस. त्यासाठी खरंच थँक्स. तु खुप स्पेशल आहेस माझ्यासाठी आणि नेहमी असशील.
सुमीतच्या या पोस्टवर अमृता धोंगडे, अक्षया नाईक यांनीही कमेंट्स केल्या आहेत. तर, सुमीतची पत्नी मोनिका महाजननेही सुमीतच्या पोस्टवर कमेंट करत भावना व्यक्त केल्या. तिने या खास सरप्राईज पोस्टसाठी सुमीतला थँक्यू म्हटलंय. “ही पोस्ट वाचताना माझ्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आहे, मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही,” असं ती म्हणाली.