मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचली. अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता लवकरच अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनबरोबर बिग बॉसच्या आगामी पर्वात सहभागी होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस हिंदी’च्या १७ व्या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमानंतर आता ‘बिग बॉस हिंदी’चे १७ वे पर्व सुरु होणार आहे. आता या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर येत आहेत.
आणखी वाचा : Video : रोमँटिक प्रपोज, किस अन्…; अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला सोहळा
यंदा बिग बॉसच्या आगामी पर्वात ‘कपल विरुद्ध सिंगल’ अशी थीम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या कार्यक्रमात काही कपल आणि काही सिंगल लोक सहभागी होणार आहेत. यासाठी अनेक जोड्यांना विचारणा करण्यात आली आहे. यात अंकिता लोखंडेच्या नावाचाही समावेश आहे.
अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनबरोबर ‘बिग बॉस’ १७ च्या घरात सहभागी होणार आहे. ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अंकिता लोखंडेच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि विकी या शोमध्ये सामील होणार आहेत. मात्र याबद्दल निर्माते किंवा अंकिता लोखंडने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी १४ डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंकिता आणि विकी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
