अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचे १२ ऑगस्ट रोजी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याचे बोललं जातयं. काल १३ ऑगस्टला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकिता तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. वडिलांच्या निधनाने तिला मोठा धक्का बसला आहे. नुकतचं अंकिताने वडिलांच्या आठवणीत आणखी एक भावूक पोस्ट शेअऱ केली आहे.
हेही वाचा- ‘लोकमान्य’ फेम अभिनेत्री आता ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत पिंकीच्या भूमिकेत दिसणार
अंकिताने पोस्टमध्ये लिहिलं आहे. पप्पा, मी तुमचे वर्णन शब्दात करू शकत नाही. पण एवढेच सांगू इच्छिते की, मी माझ्या जीवनामध्ये तुमच्यासारखा मजबूत, उत्साही आणि मोहक व्यक्तीमत्त्व असलेली व्यक्ती पाहिलेली नाही. तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर मी तुमच्याबद्दल खूप काही जाणू शकले. तुम्हाला भेटायला आलेले सगळे लोकं फक्त तुमचीच स्तुती करत होते. तुम्ही कशाप्रकारे त्यांना रोज ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठवतात, त्यांना कॉल करतात किंवा एखाद्याची आठवण आल्यावर त्याला न विसरता व्हिडीओ कॉल करता, हे सांगताना सर्वांनीच तुमची आठवण काढली. तुम्ही प्रत्येकासोबत नातं इतकं जिवंत ठेवलं होतं, आता मी पण तुमच्या स्वभावासारखी कशी आहे?, त्या प्रश्नाचं उत्तर मला आता कळालं. तुम्ही मला चांगलं आयुष्य, कधीही विसरणाऱ्या आठवणी आणि नातेसंबंधांविषयी खूप चांगली समजूत दिली….”
काही दिवसांपूर्वी अंकिताने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअऱ करत वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये किताने वडिलांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेची माहिती दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार अंकिताचे वडील व्यवसायाने बँकर होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वडिलांच्या अंत्यसंस्कारवेळी अंकिता हमसून हमसून रडत होती. अंकिताने वडील शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता.
अंकिताबद्दल बोलायचे झाले तर ती एक मोठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून केली. या मालिकेत अंकिताने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. याशिवाय अंकिता कंगना राणौतबरोबर ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातही दिसली आहे.