टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेता मागील २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय. संदीप बसवाना असं या अभिनेत्याचं नाव आहे. तर अभिनेत्रीचं नाव अश्लेषा सावंत आहे. ४७ वर्षीय संदीपने एका मुलाखतीत त्याच्या व अश्लेषाच्या नात्याबद्दल सांगितलं.

संदीप व अश्लेषा एकत्र राहतात, फिरायला जातात, सगळे सण-उत्सव सोबत साजरे करतात. लग्न न करता ते २२ वर्षांपासून एकत्र आहेत. ही माझी पत्नी आहे, असं सांगायला आपल्याला लग्न करायचं नाही, असं संदीपचं लग्नाबद्दलचं मत आहे.

संदीप म्हणाला, “मी वर्तमानात जगतो. मी आत्ता लग्न करत नाहीये. पण लग्न करो वा नाही, मी कायम माझ्या जोडीदारासोबत असतो. कदाचित भविष्यात माझे लग्नही होईल. खरं तर आपण पेपर वर्कला खूप महत्त्व देतो, त्यामुळे मी कदाचित या कारणासाठी लग्न करेनही, पण मला १० लोकांना सांगायचंय की ही माझी पत्नी आहे या कारणासाठी करणार नाही.”

पुढे संदीप म्हणाला, “जर मी अध्यात्माकडे जात असेल पण तिथे ती सोबत नसेल तर मग त्याला अर्थ नाही. बरेच लोक विचारतात, ‘तू मुंबईत का आला होतास?’ मी स्पष्ट सांगतो की मी मजा करायला आलो होतो. मला पार्टी करायची होती आणि सुंदर मुलींच्या आजूबाजूला राहायचं होतं. मला जगायचं होतं. ते हरियाणात शक्य नव्हतं म्हणून मी मुंबईत आलो. मला इथे खूप मजा आली. मग त्याचाही कंटाळा आला आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात अध्यात्म आले. आता अध्यात्मामुळे मी आयुष्यात पळवाट शोधत नाही.”

संदीप-अश्लेषाची पहिली भेट

“माझी आणि अश्लेषा सावंतची भेट ‘कमल’ या मालिकेदरम्यान झाली होती. त्यावेळी ती १८ वर्षांची होती आणि माझे वय २४ वर्षे होते. मला आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे किंवा नंतर मुलं हवी आहेत आमचं असं काहीच नव्हतं. ती माझ्याकडे बघून म्हणायची, ‘तू तुला जे करायचं आहे ते कर, मी तुझ्यासोबत आहे. मला फक्त तुझी सोबत हवी आहे.’ जवळपास २२ वर्षे झाली आम्ही एकत्र आहोत. आम्ही आयुष्यात जे पाहिलं ते सगळं एकत्रच पाहिलंय. पूर्वी अश्लेषाला ध्यानात रस नव्हता. मी २०१० मध्ये पहिल्यांदा ध्यानासाठी गेलो. त्यानंतर मी २०१४-१५ मध्ये अश्लेषाला धर्मशाळेतील ओशो आश्रमात घेऊन गेलो. ते तिला खूप आवडलं. मला आता मरण आलं तरीही काहीच फरक पडत नाही, पण सोबत प्रेम मात्र असायला हवं, अशा विचारांची ती आहे,” असं संदीप बसवाना अश्लेषाबद्दल म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदीप बसवाना ‘दिल दिया गल्लां’, ‘अपोलीना’, ‘परवरिश’, ‘सितारा’, ‘हिटलर दीदी’, ‘उडान’, ‘क्यूंकि सास भी कभी बहु थी’, ‘क्या हादसा क्या हकीकत’ या मालिकांसाठी ओळखला जातो. तर, अश्लेषा सावंतने ‘कमल’, ‘विषकन्या’, ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘सात फेरे’, ‘अनुपमा’, ‘देस में निकला होगा चांद’, ‘क्यूंकि सास भी कभी बहु थी’ या मालिकांमध्ये काम केलंय.