मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांनी मराठीसह हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहेत. त्यांना एकता कपूरच्या ‘कसम से’ मालिकेत नकारात्मक भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळाली. दोन दशकांहून जास्त काळांपासून अभिनयविश्वात सक्रिय असलेल्या अश्विनी यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यांचे पती हे सुप्रसिद्ध अभिनेते मुरली शर्मा आहेत. ५४ वर्षीय अश्विनी या आई होऊ शकल्या नाहीत. काही शारीरिक समस्यामुळे आई न होऊ शकल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी काळसेकर यांना मूल नसण्याबाबत विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, “खरं तर आम्ही बाळासाठी प्रयत्न केले. पण मला किडनीची समस्या आहे. त्यावेळी सरोगसीची फॅशन नव्हती आणि आमच्याकडे तेवढे पैसेही नव्हते. आम्ही संघर्ष करत होतो, प्रयत्न करत होतो. त्यानंतर एक वेळ अशी आली की डॉक्टर म्हणाले, ‘तुझी किडनी भार उचलू शकत नाही. तर यामुळे एकतर तुझ्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होतील किंवा बाळावर होतील’. त्यानंतर डॉक्टरांनी पूर्णपणे नकार दिला. मग आम्ही सरोगसीसाठीही प्रयत्न केला नाही.”

हेही वाचा – प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

बाईपणाचं वर्तुळ पूर्ण जगायचं होतं पण…

हा सगळा नशिबाचा खेळ आहे, असं अश्विनी काळसेकर मुलं न होण्याबद्दल म्हणाल्या. “मला जे हवं होतं ते नाही मिळू शकलं. सगळी नशिबाची गोष्ट आहे. वाईट वाटतं. कारण मी पारंपरिक विचारांची आहे, त्यामुळे मला बाईपणाचं एक पूर्ण वर्तुळ जगायचं होतं, पण ते नाही होऊ शकलं. कदाचित माझ्या नशिबात माझे सासू-सासे व आई-वडिलांची सेवा करणं लिहिलेलं होतं. तेही आता आमच्या मुलांसारखे आहेत, तर मी त्यांची सेवा करतेय,” असं अश्विनी काळसेकर म्हणाल्या.

Ashwini Kalsekar On Not Having Kids
अश्विनी काळसेकर व त्यांचे पती मुरली शर्मा (फोटो – इन्स्टाग्राम)

स्वतःची मुलं नसल्याने त्यांनी दोन श्वान पाळले आहेत. ते श्वान त्यांच्या मुलांसारखे आहेत. त्यांच्यासाठी एक नॅनी ठेवली आहे, जी त्यांची काळजी घेते, असं अश्विनी काळसेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा – पुष्पा-श्रीवल्लीचा रोमान्स घरबसल्या पाहता येणार, Pushpa 2 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनी काळसेकर यांना एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी आतापर्यंत अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘हमारे बारह’, ‘जोधा अकबर’, ‘फू बाई फू’ आणि ‘फूंक’ सारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. अश्विनी यांनी २००९ मध्ये मुरली शर्मा यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघेही सिनेविश्वात सक्रिय आहेत. मुरली शर्मा नुकतेच ‘देवरा: पार्ट 1’ मध्ये झळकले होते.