अभिनेत्री दलजीत कौर तिच्या व्यावसायिक नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतने दुसरं लग्न केलं होतं, ती पतीबरोबर राहायला विदेशात स्थायिक झाली होती, पण तिचं लग्न मोडलं. दलजीतला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.
दलजीतला दुसऱ्या लग्नानंतर खूप मानसिक त्रास सहन करावा लागला होता. सध्या ती मुलाबरोबर मुंबईत राहतेय. आता ती दुसऱ्या लग्नात आलेल्या वाईट अनुभवातून सावरतेय. आता दलजीतने तिच्या पहिल्या पतीबद्दल वक्तव्य केलं आहे. शालीनच्या प्रेमात असताना त्याच्याबद्दल कोणी वाईट बोललेलं अजिबात ऐकून घ्यायचे नाहीत, असं दलजीतने सांगितलं.
पहिल्या पतीबद्दल काय म्हणाली दलजीत कौर?
गॅलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दलजीत कौरने तिचा पती शालीन भनोतबद्दल भावना व्यक्त केल्या. “जेव्हा मी पहिल्यांदा प्रेमात पडले होते, तेव्हा मला वाटत होतं की मी फक्त त्याच्याजवळ बसून राहावं. मी वेड्यासारखं प्रेम करणारी मुलगी होते. पण एक वेळ अशी आली की लोक मला त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगत होते, त्या सगळ्याची जाणीव मला नंतर झाली. जेव्हा मला ते सांगत होते, तेव्हा मी त्यांच्याशी बोलणंच सोडायचे. कारण मला वाटायचं की त्यांची हिंमत कशी होते माझ्या जोडीदाराबद्दल बोलायची?” असं दलजीत कौर म्हणाली.
दलजीतने आता सगळं लक्ष तिचा मुलगा जेडनवर केंद्रित केलं आहे. आधी जोडीदाराबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह होते, पण आता मुलगाच सर्वस्व असल्याचं दलजीत सांगते. “आता ती सुरक्षिततेची भावना फक्त माझा मुलगा जेडनसाठी आहे. आता ते प्रेमही फक्त त्याच्यासाठीच आहे. आता मी एकटीच आहे आणि जेडन व माझे आई-वडीलच माझं सर्वस्व आहेत,” असं दलजीत म्हणाले.
दलजीतचं दुसरं लग्नही टिकलं नाही
शालीन भनोतपासून घटस्फोट घेतल्यानंतर दलजीत एकटीच मुलाचा सांभाळ करत होती. तिने २०२३ मध्ये केन्या येथील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. पण तिचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. १० महिन्यांतच दलजीत व निखिलचा घटस्फोट झाला. आता दलजीत तिचा मुलगा व आई-वडिलांबरोबर राहतेय.